बलात्कार…

लहान असताना टिव्ही चालू केला आणि कोणतीही वृत्तवाहिनी सुरू केली , तर बहुतेक दर एका महिन्याने बातमी असायची ती ‘बलात्कारा’ची! मग त्या वयात प्रश्न पडायचा की, हे बलात्कार म्हणजे नक्की काय ? तो मुलींवरचं कसा काय होतो ? कोण करतं ? का करतं ? रुग्णालयात न्यावं लागतं, एवढं होतं तरी काय ?

लहानपणीच्या त्या गोड जगात सर्व गोडचं वाटतं, आपल्या आजूबाजूची माणसं आपले लाड करतात असचं वाटतं. परंतु वाढतं वय खूप काही शिक‌वत असते. आपल्या आजूबाजूची लोकं, त्यांच्या नजरा, पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वांमधून कळू लागतं की बलात्कार घडतो कसा! जेव्हा माणसातील माणूस मरून त्याच्यातील कामवासना, आसुरी इच्छा किंवा मनातील द्वेष यांचे बांध फुटून त्याच्यातील राक्षस त्याचा ताबा घेतो आणि अशावेळी एका स्त्रीविरूद्ध क्रूर कृत्य केलं जातं ते  म्हणजे ‘बलात्कार’! एकविसाव्या शतकात छळण्याच्या बाबतीतही जग पुढे चाललं आहे याचा जणू पुरावाचं!

बलात्कार झाला की प्रचंड शारिरीक यातना भोगणार्या त्या पीडित अबलेची कूस मानसिक यातना आणि सामाजातील मानहानी यांनी भरली जाते. बलात्कार फक्त शरीराचा कुठे होतो, तो होतो पीडित मुलीच्या संपूर्ण आयुष्याचा, तिच्या अब्रूचा, तिच्या आत्म्याचा! न्याय मागायला ती उभी राहिल ही, परंतु प्रश्न पडतो न्याय मिळेल का? न्याय मिळेपर्यंत समाजाचे टोमणे आणि वखवखलेल्या,  तुच्छ नजरा तिचे लचके तोडायला असतातचं की! याचमुळे अनेक स्त्रिया कोर्टात धाव न घेता असे अत्याचार तोंड दाबून सहन करतात.

असं म्हणतात की  ‘स्त्री ही कळी असते, तिला शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या फुलवायचं असतं’  परंतु बलात्कारासारख्या अघोरी कृत्यामुळे ती कुसकरली, चिरडली जाते. शारीरिक बलात्कार तर आहेचं पण दररोज जो लैगिंक अत्याचार स्त्रियांना सहन करा‌वा लागतो त्याचं काय? म्हणजे कळत-नकळत प्रत्येक स्त्रिचा बलात्कार होतचं असतो. कधी शारिरीक दृष्ट्या तर कधी नजरेने. मग ह्या बलात्काराला शिक्षा तरी कोणत्या  न्यायालयात देणार ?

नुकताच महाराष्ट्र सरकारने ‘शक्ती’ विधेयकाला मंजूरी दिली आहे. या विधेयकानुसार बलात्कार करणार्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.  सर्व आदिशक्तींना या ‘शक्ती’ कायद्यातंर्गत नवीन शक्ती मिळण्याची शक्यता आहे.

 

 ~ प्रणाली केशव नलावडे

     विभाग-ठाणे

शोषितांची ढाल साऊ…..

 तीन जानेवारीच्या दिनी,

आम्ही सावित्रीच्या लेकी एकत्र येऊ,  

शिक्षणापुढे आकाश ठेंगणे, 

तिचेच गाणे आम्ही लेकी साऱ्या गाऊ, 

शोषितांची ढाल, आमची माऊली ती साऊ…. 

 

जरा आठवा साऊंचा इतिहास, खुप काय काय सहन कराव लागलं साऊंनां,  पण त्यांनी संघर्षही तेवढाच केला . त्याकाळी मुलींना शिक्षण न्हवत फक्त मुलांनाच शिक्षण उपलब्ध होत, आणि अशा काळात साऊंनीं  स्वता शिक्षण घेतल व कुठलीही मुलगी स्त्री शिक्षणाशी वंचित राहु नये म्हणून त्यांनी त्यांच्या वाड्यात मुलींना शिकवणं सुरू केल. पण त्यात ही त्यांना खुप अडचणी येऊ लागल्या. मुली शिकून काय करतील, मुलींच शिकण योग्य नाही असे काही लोक बोलू  लागले.  साऊंच्या अंगावर शेण, दगड फेकून विरोध करत होते, पण तरीही साऊ खचल्या नाही, उलट त्यांनी त्यातही संघर्ष केला. आजच्या युगात आपण काही करायला गेलो आणि त्यात कोणाचाही विरोध असेल तर आपल्याला जे करायच  होत ते राहिल बाजूला, आणि आपण त्या लोकांशी  भांडंत बसतो. पण साऊंनीं तसे केल नाही. लोक जरी विरोध करत असले, तरी त्यांनी लोकांकडे लक्ष न देता संघर्ष केला.

आपण काहीच करू शकत नाही, आपला जन्म फक्त घर आणि मुलं सांभाळण्यासाठी झाला आहे व नवऱ्याने सोडून दिल्यानंतर चुक आपलीच आहे, अस वाटणाऱ्या शोषित महिलांसाठी व मुलींसाठी सावित्रीबाई फुले या एक ढाल होत्या. साऊंनीं स्त्रियांना जाणीव करून दिली होती की, आपण  पुरूषांपेक्षा कमी नाही.

आता आपण ही  शिक्षण  घेऊ शकतो. का? आपणच फक्त सहन करायच …?  आता आपण शोषित राहायच नाही तर शहान व्हायच. अस त्यांनी स्त्रीयांना पटवून दिले. म्हणून त्यांना शोषितांची ढाल असे म्हणत. साऊंच्या या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देणारे, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे महात्मा जोतिबा फुले म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचे पती. जोतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनां साऊ अस म्हणत होते. तस तर कुठल्याही यशस्वी पुरूषाच्या मागे त्याच्या पत्नीचा हात असतो अस म्हणतात, पण हिते  तर एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या पतिचा हात च नाही तर पूर्ण पतीच आहे.

            म्हणूनच मला म्हणावसं वाटते की.. 

            नका बनू माधुरी, ऐश्वर्या, करिष्मा 

            बना तुम्ही फक्त जिजाऊ, सावित्री, रमा… 

 

~ प्रज्ञा राजेंद्र गायकवाड

              विभाग-मुंबई    

आता अजुन किती सहन करावे?

मुलींना आजची सावित्री, रमाई माता,  जिजाऊ,  झाशीची राणी होण्याचे प्रयत्न करावे असं सार जग सांगते. पण मुलींना ह्या महान महिलांचे गुण आपल्या अंगी आत्मसात करतांना याच जगातील काही लोकांना चांगलं वाटत नाही.  त्यांचे विचार या मुलींबद्दल फार क्रूर बनतात आणि मग ते कूट नीती चालू करतात.  ह्या मुलींनी थोडं जरी ज्ञान इतरांना वाटण्याचा प्रयत्न केला तर तिला लगेचच लोकांचे टोचणे/ टोमणे येतात. “एक/दोन पुस्तक काय वाचलस खूपच हुशार झाली असं समजते स्वतःला, आम्हाला चालली शिकवायला. हिच्यापेक्षा तर चार उन्हाळे जास्तच पाहिलेत आम्ही!” अस बोलून मुलींचे खच्चीकरण करतात. आणि वरून नियम पण लावतात रस्त्याने जाताना, कुणाला बोलतांना, चार माणसात  मुलींनी लाजून खाली मान घालून राहावं, जास्त बोलू नये. लॉन्ग ड्रेस घालावे, कोणती ही स्टाईल करू नये,  इत्यादी नियमात ठेऊन तिच्यावर मानसिक अत्त्याचार करतात. तरी पण मुली कोणताच प्रश्न न करता खंबीरपणे जगतात.  एवढा सारा अन्याय सहन करून सुद्धा मुलींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते.

चला मान्य केल कि मुलींनी समाजाचाच्या सांगण्याप्रमाणे अंगभरून कपडे घातलेही पण बलात्कारासारखे प्रकरण थांबलेत का? कोणती मुलगी आज एकटी सुनसान रस्त्याने जाण्याचे धाडस करते का? याचं कारण फक्त आणि फक्त काही ‘हवस’ चे शिकारी कुत्रे माणसाच्या रूपात असतात. पहिले म्हणतं होते कि सोळावं वर्ष धोक्याचं ग… पण आजकाल तर महिला वर्ग प्रत्येक वयात धोक्यात असते. यांच्या नजरेत म्हातारी आजी सुद्धा तरुण मुली प्रमाणेच दिसते. मग सांगा ना अजून त्या म्हाताऱ्या बाई न शॉर्ट ड्रेस घातला असेल का? एवढंच नाही प्रत्येक ठिकाणी असे काही नराधम आहेत.

बस मध्ये सुद्धा महिलावर्गाची छेड काढतात. बस मध्ये जागा देण्याच्या नावाने अंगाला हात लावतात, एकदम टक लावून महिलांकडे बघतात. तरी पण काही महिला त्यांचा स्टॉप येईपर्यंत त्यांच्या घाण प्रकरणाला सहन करतात, आणि काही तिथेच कानाखाली लगावतात. एवढा सारा अपराध करून सुद्धा महिला वर्गालाच तुच्छ, निर्लज्ज इत्यादी बोलतात.

सावित्री बाई फुलेंना सुद्धा समाजकार्य करतांना अंगावर शेण फेकले, जे नाही ते बोलणं बोलले, तरी पण सावित्री बाई डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. आज त्यांच्यामुळेच मुली शिकल्या, सावरल्या आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकल्या. आज महिलांना स्वातंत्र्य असलं तरी ती सती जातं आहे. माणसांच्या मानसिक त्रासाच्या अग्नित भाजून तिच्या इच्छा आकांक्षा ची होळी पेटून राख होत आहे. एवढंच नाही तर संसाराच्या नावाने तिच्यावर मर्यादेची सीमारेखा टाकलेली आहे. आता अजून किती सहन करावे?

एखादा मुलगा दारू, पुड्या, इत्यादी व्यसन करत असेल, तर लगेच त्याच्या घरची मंडळी त्याचे लग्न करायचं ठरवतात. का? तर लग्न झाल्यावर तो सुधारेल. पण त्या बिघडलेल्या मुलाला सुधारवण्यासाठी त्या मुलीची कशाला आहुती देता? तिचे पण काही स्वप्न असतील. तिला कोणता अधिकारी बनायचे असेल? स्वतःच्या पायावर उभं रहायचं असेल? तिची का जिंदगी बरबाद करतात? त्यांचं म्हणणं अस असते कि, मुलीने कितीही मोठ्ठ शिक्षण शिकूदे तिला तव्याचंच बुढ घासावं लागते. बर असो! लग्नालाही ती तयार होईल पण कमीतकमी तिचा होणारा जीवनसाथी तर चांगला असावा, असं तर तिला वाटत असेल. इतकच नाही तर आमच्या घरी इतकं आहे, आमच्या घरी तितकं आहे, अस सांगून  भरमसाठ हुंडा पण घेतात. तिचा बाप कर्ज काढून लोकांच्या हात/ पाय जोडून कसं तरी  तीचे लग्न लावून देतो, चार /आठ दिवस सगळेच तिच्याशी चांगल वागतात. मग हुंड्यापायी म्हणा किंवा मुलगाच हवा आणि  इतर काही गोष्टींमुळे तिच्यावर अन्याय अत्याचार सुरु होतात. तिचा बळी घेतला जातो किंवा तिला माहेरी कायमच पाठवलं जाते. मग लोक  याचा विचार का करत नाहीत. प्रत्येक वेळेस तिच्याच इच्छा आकांक्षाचा खून करावा का? समाजाच्या इतक्या कडक  बेड्यातुन स्त्री कधी सुटेल हा प्रश्नच आहे?  स्त्रियांनी आता अजून किती सहन करावे?

मुलींना पहिली मासिक पाळी आली रे आली कि तिला घरात, समाजात वावरायचा अधिकार संपतो. देवळाचे दरवाजे बंद होतात. का? तर मासिक पाळी हा  विटाळ असतो. असे म्हणतात.  एवढेच नाही तर काही स्त्रियांना मासिक पाळी मध्ये स्वयंपाक करण्याचा सुद्धा अधिकार नाही. पुजापाठ करण्याचा अधिकार नाही. तुळशी जवळ, फुलांच्या झाडाजवळ सुद्धा जाण्यास बंदी असते. लोक का अस वागतात कळतच नाही. स्त्रियांसाठी काय चांगल काय वाईट हे तेच ठरवतात. काही ठिकाणी तर पहिली पाळी आली कि मुलींच लग्न करून टाकतात. तिला अठरा वर्षे पूर्ण सुद्धा होऊ देत नाहीत. त्यांना काही उपदेश दिला तर ते म्हणतात कि ही आमच्या  घरची  रीत आहे आणि ती  पिढ्यानं पिढ्या चालत आलेली आहे; असे गर्वाने सांगतात. पण कमी वयात लग्न केल्यामुळे मुलीच्या जीवाला धोका असतो, ती आई होण्यास  पात्र नसते. पण तिच्यावर संसाराचा गाडा ओढून नेण्यासाठी जबरदस्तीने लादली जाते. मुलगी लवकर आई होण्यास पात्र नाही झाली तर लगेच बाहेरबांधा (जादू मंत्र ) करतात. पण तिला चांगल्या डॉक्टर कडे नेण्यासाठी थोडा विचारच करतील. या कारणामुळे मुलींना  प्रसूती मध्ये कुपोषित बाळ जन्माला येते. यात बाळ आणि आई दोघांच्या जीवाची चिंतच असते. बऱ्याच जाहिरातीत, अंगणवाडीत, हॉस्पिटल मध्ये, आणि इत्यादी ठिकाणी मुलींचं अठरा वर्षं पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नका म्हणून सांगतात. पण याचा परिणाम फक्त 75% लोकांवरच होतो बाकी 25% लोकांवर याचा काहीच परिणाम होत नाही. आज प्रत्येक ठिकाणी मुलगी/ महिला ह्या असुरक्षित आहेत. त्यांचं मानसिक शोषण केल जाते. बऱ्याच स्त्रिया  मानसिक गुलाम बनलेल्या आहेत. यात स्त्रियांचा सुद्धा बऱ्यापैकी वाटा आहे. स्त्रिया तरी  कूठ  एकमेकांच्या अडचणी समजून घेतात. एखाद्या स्त्री वर काही अन्याय होत असेल तर चुपचाप बघतात. “ते तिचं म्याटर आहे. जाऊदे अस म्हणतात.’ पण खंबीरपणे एकमेकींना साथ देत नाही; ही एक दुःखाची बाब आहे. या कारणानेच काही नराधमांची अजून हिम्मत वाढते. आणि बलात्कार इत्यादी घटनेत त्याचे रूपांतर होते. आता अजून किती सहन करावे?

 

~ दिक्षा गौतम इंगोले

   विभाग औरंगाबाद

जीवनानुभव…

जीवनात जसं वाटतं तसं घडतच असं नाही पण. अनेकदा असं काहीतरी घडतं जे आपल्याला अनपेक्षित असतं आणि त्यामुळे मिळणारे क्षण हे एक कटू अनुभव म्हणून कायम आयुष्यात सोबत राहतात. काही अनुभव हे गोड आठवणी देतात, तर काही अनुभव हे तितक्याच वेदना. पण या वेदनातुन केव्हातरी बाहेर पडायच असतं आणि नव्या जीवनाचं स्वागत करायचं असतं. पण तरीही या आठवणींचा कप्पा तसाच मनात घर करून राहतो. त्यामुळे त्याला किती महत्व द्यायचं हे आपल्या हातात असतं. त्याच अनुभवात न राहता, नव्याने आयुष्याकडे पाहिलं की वेदना हळू हळू कमी व्हायला लागतात. जीवनातला एक अनपेक्षित असा खूप महत्त्वाचा अनुभव तुम्हा सर्वांनाच सांगावासा वाटतोय.

शालेय प्रवास संपला आणि महाविद्यालयीन प्रवासाला सुरुवात झाली होती. 16 वर्षाची सखी आता मुक्त आयुष्याचा आनंद घेण्याच्या तयारीत हर्षाने नाचत होती. खूप आनंदी होती. तिने तिच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेतला अन्  तिचं आयुष्य मुक्तपणे तिने जगायला सुरुवात केली होती. त्याचदरम्यान एके दिवशी तिची ओळख संजोग नावाच्या पुरुषाशी झाली. पुरुष असा उल्लेख केला कारण त्याच वय जवळ जवळ तिच्यापेक्षा दुप्पट होतं. त्याने जेव्हा पहिल्यांदा सखी ला पाहिलं तेव्हा जणू काही त्याने तिच्यात, त्याला अपेक्षित असलेल सावज शोधलं असावं. त्याच्या नजरेतले ते वेगळे भाव नजरेतली ती विकृत भावना सखी ओळखूच शकली नाही. संजोग सखी ला कोणत्या न कोणत्या कामाच्या निमित्ताने इमारतीतचं भेटू लागला. दोघेही एकाच इमारतीत राहत असल्याने भेटणं हे रोजचं झालं होतं. संजोग हा विवाहित असल्याने आणि वयाने मोठा असल्याने सखी त्याला मामा म्हणायची. त्याला सखी तिच्या लाघवी बोलण्याने , नुकत्याच वयात आलेल्या तिच्या शरीरयष्टी मुळे खूप भावली होती . तिच्याशी जवळीक साधता यावी तिला रोज बघता यावं म्हणून संजोग सखी च्या घरच्यांशी विश्वासाचं नातं तयार करू लागला. त्याचा सर्वांसोबतचा जिव्हाळा पाहून सखी चा तिच्या मामा बद्दलचा विश्वास आणखी दृढ होत गेला. सखी विश्वासाने मामाला म्हणजेच संजोग ला तिच्या कॉलेज मधल्या मजेशीर गमतीजमती , मजेशीर किस्से , कॉलेजात येता जाता घडलेल्या घटना ,  तिच्या आवडी निवडी सांगू लागली. ती खूप मुक्तपणे आपल्या भावना मांडत असायची, तिच्या मनात कधीच काहीच नसायचं. हळू हळू त्यांच्यात एक विश्वासाचं नातं तयार होऊ लागलं. पण संजोग च्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं, याची चाहूल सखी ला अजिबातच नव्हती. 1 महिना उलटल्यावर संजोग ला त्याचा मोह अनावर होऊ लागला तो सखी ला मध्ये मध्ये एकट गाठू लागला आणि चाळे करू लागला. कधी तिला रस्त्यातच मिठी मारणं, कधी गालाची जबरदस्ती पापी घेणं, हे सगळं सखी ला अजिबातचं आवडतं नव्हतं. जणू काही तिचा विश्वास तुटल्या सारखंच हे घडत होतं. तिनं हे घरी सांगायचं ठरवलं, पण सखी चे आई बाबा हळव्या मनाचे आणि आजारी असल्याने त्यांना हा धक्का सहन होईल का ? हा तर मोठा प्रश्न तिच्या समोर होताचं; पण त्याचं बरोबर आपण हे घरी सांगितल्यावर आपले कॉलेज बंद होणार तर नाही ना? हा विचार तीच्या समोर आवासून उभा होता. आणि आपल्या घरचे वातावरण तर बिघडणार नाही ना? असे प्रश्न तिच्या मनात तयार झाले.

त्यामुळे तिने या संकटाशी एकटीनेच सामना करायचं ठरवलं. तिने संजोग शी संवाद बंद करण्याचा निर्णय घेतला. तिने तिची कॉलेज ला जाण्याची वेळ आणि जाण्याचा रस्ता ही बदलला पण संजोग हा सतत इमारती खाली उभं राहून तिची वाट पाहत राहायचा तो तिचा कॉलेज ला जाण्यासाठीचा रस्ता ही थांबवू लागला. तिला जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करू लागला. सखी काहीच न बोलल्यामुळे जबरदस्ती तिची परवानगी न घेता तिला टॅक्सी ने सोडू लागला. तिच्या सोबत वेगवेगळ्या हरकती करू लागला . 16 वर्षाच्या सखीची मानसिक स्थिती ढासळत चालली होती. तिच्या मनाची अस्वस्थता तिला कुठे व्यक्त करावी हे कळत नव्हतं. आपल्या सोबत असं घडतंय हे ती कुणालाच सांगू शकत नव्हती. एके दिवशी संजोग कॉलेजच्या गेट वर तिला दिसला. तेव्हा सखी जास्त घाबरली! तिने तिच्या मैत्रिणींना माझ्या सोबतच रहा आपण एकत्र घरी जाऊ असं म्हटलं आणि रस्ता बदलून जाण्याचा निर्णय घेतला असता संजोग ने सर्वांसमक्ष कशाचाही विचार न करता तिला अडवलं आणि “मला खूप महत्त्वाचं बोलायचंय मला माझं उत्तर मिळालं की , मी तुला अजिबात त्रास देणार नाही, त्यामुळे प्लिज थांब आणि ऐक मी काय म्हणतोय ते”. असं संजोग म्हणाला सखीच्या मैत्रिणी ह्या प्रकारामुळे भांबावल्या आणि त्या तिथून निघून गेल्या. सखी खूप रागात होती, पण आपल्या सोबत कोण नाही हे पाहून ती आतून घाबरली. कारण हे प्रकरण आता थेट कॉलेजच्या गेट पर्यंत येऊन पोहोचल होतं. तरीही तिने हिम्मत करत म्हटलं बोला. काय बोलायचं ते! संजोग म्हणाला “माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, आणि तू मला हवी आहेस! तू फक्त माझी आहेस. तुझं माझ्यावर प्रेम आहे का ? हे मला ऎकायचंय”. सखी ला राग अनावर झाला. आणि तिने एका दमात म्हटल नाही. कधीच नाही. शी! मला खूप लाज वाटतेय ज्याला मी मामा म्हणतेय आज तो मला मिळवण्याच्या आणि माझ्यावर हक्क गाजवण्याच्या गोष्टी करतोय. सखी तिथून रागाने निघणार इतक्यात संजोग तिचा घट्ट हात पकडून आवळतो, तिला धमक्या देऊ लागतो. ह्या प्रकारा मुळे सखी खूप जास्त हतबल होते. कॉलेज च्या आवारात कोणालाही काही कळू नये म्हणुन शांत राहते. तिला कॉलेज च्या बाहेरच सगळ्या देखत संजोग उचलून टॅक्सी मध्ये फेकतो आणि टॅक्सी वाल्याला लॉज वर चा पत्ता सांगतो. सखी 16 वर्षाची पण तितकीच निरागस मुलगी. तिला कुठे आणि कशाला घेऊन चालला आहे, याची कल्पना येत नाही. टॅक्सी वाला सखी कडे उदास भावनेने पाहतो. पण त्याच्या या उदासीनतेला जास्तीचा पैसा क्षणात बदलतो.

लॉज वर घेऊन गेलेल्या ठिकाणी सखी ला संजोग सांगतो! “अजिबात आरडा ओरडा करायचा नाही. कोणी काही विचारलं की सांगायचं मी माझ्या मर्जीने इथे आली आहे. नाहीतर तुझ्या आई बापाला आज काही मी जिता सोडत नसतो.” सखीचा आई बाबांवर खूप जीव. ती हतबल होऊन जे सांगितलंय तसच वागते. संजोग तिला एका खोलीत घेऊन बेड वर जोरात आदळतो. तिला म्हणतो “आज मी तुला दाखवतो! माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि ते मिळवण्यासाठी मी काय करू शकतो. तुला खूप माज आहे ना! तुझ्या छान असण्याचा, आज या सौंदर्यावर मी माझा हक्क दाखवतो”. सखी खूप विरोध करते पण संजोग काहीही ऐकत नाही. तो सखीच्या जवळ जातो आणि तिची ओढणी बाजूला सारतो. सखी त्याला विनवणी करते हे खुप चुकीचं आहे प्लिज मला सोडा. संजोग चा स्वतःवरचा ताबा सुटतो. तो सखी ला आणखी जवळ खेचनार इतक्यात संजोग ला एक फोन येतो. त्याला तो फोन महत्त्वाचा वाटतो म्हणून तो उचलतो आणि फोन वरचा समोर असलेला संजोग चा मित्र मुलीचं सील तुटलं की रक्त येईल, ती बेशुद्ध होईल, खुप महागात पडेल तुला, त्यामुळे बोंभाटा होईल. त्यामुळे तू तिथून निघ, असा त्याचा मित्र त्याला सल्ला देतो. सखी आणखी घाबरते. संजोग सखी ला जबरदस्ती चुंबन देऊन तिच्या ओठांचा चावा घेत “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुला काही होऊ नये म्हणून मी आज तुला काहीही न करता घरी सोडतोय, पण तू माझी आहेस हे लक्षात ठेव” असं बोलून तिला इमारती बाहेर सोडतो. तो दिवस, ती घटना , तो विकृत स्पर्श, ह्या साऱ्या गोष्टींचा  सखीच्या मनावर खूप मोठा आघात होतो. तो धक्का, तो प्रसंग तिच्या जीवनाचा मोठा आणि वाईट अनुभव म्हणून तिच्या आठवणीत राहतो. ही आठवण हा धक्का पुसण्यासाठीचा आधार ती शोधत राहते पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी पण तिला त्यातून बाहेर येता येत नाही.

हा अनुभव सखी ला माणस ओळखणं शिकवून जातो. या घटनेनंतर सखी कोलमडते पण ती हिमतीनं उभ राहण्या साठी पुढे ही घटनाच तिचा आधार ठरते. या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी हा जीवनानुभव तिचा मार्गदर्शक ठरतो तो कायमचं! कारण ती जेव्हा या घटनेतून सावरते, तेव्हा ती अनेक मुलींचा आधार होते, आणि ती त्यांना लढण्यासाठी ,बोलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठीची प्रेरणा देत राहते. कारण ती तिच्यात या घटनेवर बोलण्याची जेव्हा हिम्मत आणते. तो वर ती व्यक्ती कायमची पसार झालेली असते. जे तिच्यासोबत घडलं ते इतर कोणासोबत घडू नये, यासाठी ती आजही तिचं काम चालूच ठेवते. कारण तो व्रण ती जखम कायम सखीच्या मनात भळभळत राहते एका कटू अनुभवासारखी…

~ ऍड. अनुराधा शोभा भगवान नारकर

विभाग-मुंबई

किसान आंदोलन…

2014 से भारत मे बीजेपी सरकार का राज चल रहा है। बीजेपी सरकार पूरी तरह से देश में लोकतंत्र की जगह राजतंत्र चला रही है। भारत देश को हिंदुराष्ट्र बनाने जा रही है। देश को हिंदू राष्ट्र मे परिवर्तन करने कीे कोशिश में बीजेपी ने भारत के कानून में कुल मिला के 104 अमेंडमेंट की है। प्रमुख 370 रद्द किया गया। CAA/NRC को लाया गया, तीन तलाक, लेबर लॉ अमेनडमेंट ओर अब किसान बिल, यह सब कानून बीजेपी सरकारने बहुमत के जोर पर असंवैधानिक रूप से लागू किया है। जिसके लिए जनता ने हमेशा विरोध किया है। लेकिन किसान आंदोलन से पहले वाले आंदोलन जैसे CAA/NRC का दिल्ली मे जो आंदोलन था, प्रोटेस्ट था, उसे शक्तिप्रदर्शन से असफल किया गया। इसी तरह से बाकी सारी आंदोलको को बीजेपी ने खत्म किया है। लेकिन किसानों का आंदोलन वह इतनी आसानी से शक्ती का इस्तेमाल करके भी बंद नही कर सकते। क्योंकि किसानों का आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तर पर सारी दुनिया देख रही है। सोशल मीडिया और इंटरनेट आंदोलन से जुडा हुआ है। इसलिये बीजेपी सरकार आंदोलन को पोलीस पावर दिखा के ऐसे बंद नही कर सकते। इसलिए किसानों से बात करके इस समस्या का उपाय धुंढा जा रहा है। लेकिन बीजेपी अभी भी इस कानून को सही बता रही है। बीजेपी का कहना है कि, कानून किसान के विकास के लिए बनाया गया है। ये पूरी तरह से किसानों की हित मे है। लेकिन किसान कहता है कि यह कानून किसानों के हित मे नही है। यह कानून अदानी ओर अंबानी जैसे बड़े बड़े व्यापारियों के हित में है।

आखिर यह बिल है क्या? और इसका विरोध देशभर में क्यों हो रहा है? इसीलिए हमे यह बिल जानना भी जरुरी है।

1) स्टॉक लिस्ट फ्री कर दी गई है, सरकार का कहना है कि, किसान और व्यापारी अनाज का भंडारण कर सकते है। लेकिन किसान का कहना है की, इससे हमे कोई फायदा नही होगा। क्योंकी हम अनाज का भंडारण पहले से ही करते आ रहे है, ओर मंडी में बेचते थे। लेकिन अब व्यापारीयो को अनाज का भंडारण करने की आजादी मिलेगी और फिर अपने मर्जी के दाम से अनाज को मेहंगा बेच सकते है। जो नाही किसान को फायदा दिलाएगा और ना ही उपभोक्ता को। इसलिए यह बिल किसान नही चाहते है।

2) दुसरा बिल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बताता है। जिसमें किसान और व्यापारियों के बीच मे कॉन्ट्रॅक्ट होगा। लेकीन इस में किसान विरोध करते है, क्योंकि वो जानते है कि, इस तरह से हम अपना पुरा अनाज कही भी बेच नही पायेंगे। और कॉन्ट्रॅक्ट दो लोगों में होता है, जो समान होते है। यहा पर व्यापारी सशक्त है और किसान उतना सशक्त नही है। अगर कॉन्ट्रॅक्ट में कोई गडबडी होती है, किसान के साथ कुछ भी अन्याय होता है। तो किसान को कोर्ट मे जाने का अधिकार भी नही है। किसान सिर्फ डी.जी.एम. के ऑफिस मे शिकायत कर सकता है। उसे वहा पर न्याय नही मिल पायेगा। इसलिए किसान इस बिल का विरोध करते है।

3) तिसरा बिल फ्री मार्केट: जिसमें सरकार कहती है कि, किसान अपना अनाज किसी भी मंडी मे बेॅच सकता है। उसे इसकी आजादी है। किसान कहता है कि, हमे अपना अनाज अपनी मर्जीसे कही भी बेचने की आजादी पहले से हासिल थी। लेकिन हम चाहते है की, सरकार हम से सरकारी मंडी के जरिये अनाज खरिदे। सरकारी मंडी बहुत जगा पर नही है। इसलिए किसान को ट्रांसपोर्टेशन का काफी खर्चा होता है। इसलिए किसान चाहता है कि, सरकारी मंडीया बढाई जाने चाहीए। क्योंकी सरकारी मंडी मे शुल्क तय किया जाता है। रजिस्ट्रेशन होता है। रेकॉर्डिंग होती है। और सरकारी कानून लागू होता है। प्रायव्हेट मंडी में यह सब नही होता है। इसलिए किसान चाहता है, एम.एस.पी. को कानूनी कर के हमे सरकारी मंडीया बना कर दी जाए। या सरकारी मंडी में हि एम.एस.पी को कानूनी करके हमारा अनाज सरकार खरीदे।

दरअसल बीजेपी सरकार का कहना है कि, हम आधुनिकता का इस्तेमाल करके किसान बिल बेहतर बनाए हुए है, और वह किसानों के हित में है। वो अमेरिका का पैटन लाना चाहते है, जब कि अमेरिका का खेती का पर्सेंटेज 11/2 % है, वहा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होती है। लेकिन भारत कृषिप्रधान देश है। यहाँ का किसान पूरे ईमानदारी से खेती करता है, और करना भी चाहता है। किसान सरकार के साथ जुड़कर खेती करना चाहता है। इसलिए किसान अपनी आजादी नही खोना चाहता और किसानों का कहना है की, सरकारने इस बिल के बारे मे किसी भी किसान के संघटनों को, किसी भी तरह का विचार, विमर्श नही किया था। और किसी भी किसानी संघटनों ने इस बिल की मांग नही की थी। और कोई भी किसानों का संघटन इस बिल का समर्थन नही करता है। इसलिए भारत के सभी किसान इस बिल का विरोध करते है। इसलिए पंजाब, हरियाणा से किसान दिल्ली मे प्रधानमंत्री मोदी जी से बात करने के लिए दिल्ली आ रहे थे। लेकिन बीजेपी सरकार किसानों का बिल बदलना नही चाहती है। इसलिए उन्होने किसानों को दिल्ली में आने से मना कर दिया। किसान दिल्ली के बॉर्डर पे रुके हुए है। बीजेपी सरकारने आम आदमी पार्टी के चीफ मिनिस्टर श्री. अरविंद केजरीवाल जी से यह कहा था कि, दिल्ली के स्टेडियम मे किसानों को डिटेन किया जाए। और उनको बंदी बनाया जाए। ताकि आंदोलन असफल हो। लेकिन अरविंद केजरीवाल जीने ऐसा ना करते हुए, किसानों के आंदोलन का समर्थन किया है।

 

बीजेपी सरकार किसानों से बात कर रही है, लेकिन बिल वापस लेने के हित में नही है। और किसान इस बिल को रद्द करना चाहते है। किसान पीछे हटने वाले नही है, इसलिए बीजेपी सरकार आंदोलन को गलत तरीके से बदनाम कर रही है। बीजेपी के मंत्रीओं ने किसानों को आतंकवादी कहा है। तुकडे तुकडे गैंग कहा है। और विदेशी लोग इस आंदोलन को फंडिंग कर रहे है, इस तरह का आरोप लगाया गया है। किसान बहोत नाराज है, उन्होने टोल बंद करने का आंदोलन किया है। दिल्ली में प्रवेश करने की कोशिश करते है, तो पुलिस आंदोलन कर्ताओं को टारगेट करती है। पुलिस ने काफी लोगों को भीतर किया है। आंदोलन के उन्नीस वे दिन पे सभी किसानों ने उपवास रख के इस बिल का विरोध किया है। आम आदमी के सभी कार्यकर्ताओ ने भी उपवास रखा था। और देश की सभी समर्थको ने किसान आंदोलन के समर्थन में उपवास रखा था। फिर भी आज आंदोलन का 20 वा दिन है। बीजेपी सरकार बिल वापस नही लेने वाली है, ऐसा ही बोल रही है। इसलिए सभी राज्यों के किसान, मजदूर, समाज सेवक, वकील, संस्था, नागरिक मिलकर आंदोलन कर रहे है।

कोई भी कानून जनता के हित के लिए बनाया जाता है। अगर जनता किसी भी कानून का विरोध करती है, तो इसका मतलब यही है की, वो कानून गलत है। इसलिए इस कानून का रद्द होना जरुरी है। किसान पीछे नही हटेंगे। उनके परिवार भी इस आंदोलन में शामिल हो चुके है। छह महिने की पुरी तयारी के साथ किसान आंदोलन कर रहे है। और जनता भी किसानो का समर्थन कर रही है। बीजेपी सरकार अपनी बात पर अडी हुई है। सारी दुनिया का लक्ष किसान आंदोलन पर है। इसलिए अच्छा होगा कि इस आंदोलन को ध्यान में रखते हुए, प्रधानमंत्री मोदी जी और राष्ट्रपती कोविंद जी इन दोनों ने अपने विशेष अधिकार का इस्तेमाल करके इस कानून को रद्द करना चाहिये। क्योंकि भारत देश कृषि प्रधान देश है। भारत का किसान खुश होगा, तो सब खुश होंगे। सरकार जनता के लिए होनी चाहिए, व्यापारीओं के लिए नही।

~  निर्मल भारतीय मानवतावादी समाज

    विभाग-नवी मुंबई