सर्व संकटावर मात करून सोपा मार्ग काढणारी भूमिका
कलानुकाळ प्रत्येक क्षेत्रात छबी उठवणारी भूमिका
. म्हणजे नारी ||
म्हणजे नारी ||
धर्म ग्रंथ असो वा कथा संग्रह असो वा साहित्य असो
नारी शिवाय पुर्ण होणार नाहीत कधी.
मग !
कोण म्हणतं नारी स्वतंत्र नाही |
जगावर राज्य करणारी राणी व्हिक्टोरिया नारीचं होती |
परिस्थिवर मात करून सतीच्या चालिला विरोध करून
स्वराज्यात झोकून देणारी जिजामाता नारीच होती |
स्वतंत्र लढ्यात झोकून देणारी
लक्ष्मीबाई नारीच होती |
परिस्थिवर मात करून शिक्षणाचा वारसा जपणारी
सावित्रीबाई नारीच होती |
भारताची पंतप्रधान इंदिरागांधी नारीचं होती |
नारी स्वतंत्र आहे.
म्हणुन,
ती चंद्रावर गेली |
नारी स्वतंत्र आहे.
म्हणुन,
ती राष्ट्रपती झाली |
नारी स्वतंत्र आहे.
म्हणुन,
ती अर्थमंत्री झाली |
अपंगांना अपंग म्हणुन मानसिकरीत्या अपंग करू नका .
तसेच,
नारीला अबला म्हणुन अबला करू नका ||
नारी स्वतंत्र आहे | स्वतंत्र राहील | स्वतंत्र राहणार ||
म्हणून म्हणतो..
सर्व संकटावर मात करून उत्तम मार्ग काढणारी भूमिका
म्हणजे नारी ||
- रमेश साळसकर