‘सद्यकालीन पत्रकारिता’

पत्रकारितेला समाजाचे दर्पण म्हंटले जाते. दर्पण म्हणजे आरसा, समाजातील सत्यतेचे प्रतिबिंब हे वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिणींमध्ये दिसते. म्हणून पत्रकारितेला समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो. १७८० मध्ये पाहिले वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट याची स्थापना झाली. पत्रकारितेचा जन्म हा नागरिकांवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी झाला.   

स्वातंत्र्यापूर्वी वृत्तपत्रे ही इंग्रजांची जी काही भारतीयांवर राज करण्याची पद्धत होती ही पद्धत कशाप्रकारे भारतीय जनतेला धोकादायक आहे. हे सांगण्याचे काम पत्रकारितेचे होते. सरकार व देशातील सामान्य जनता यांमधील दुवा म्हणजे पत्रकार होय. कोणत्याही जाती धर्माला किव्वा कोणत्याही स्तरावर बांधील न राहता समाजामध्ये चालू घडामोडीची खरीखुरी माहिती समाजासमोर मांडणे म्हणजे पत्रकारिता होय. समाजातील कोणत्याही स्तरावरील व्यक्तीवर अन्याय न होऊ देने व अन्याय झाल्यास त्या घटनेची शहानिशा करून सत्य समाजा समोर आणने हे पत्रकाराचे कार्य असते. स्वातंत्र्यापूर्वी देशातील सामान्य जनतेवर अन्याय मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि याला विरोध करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी आपली विचारशैली सत्ताधारी वर्गाला समजण्यासाठी वृत्तपत्रांची स्थापना केली. 

वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडवून आणण्याचे काम केले. समाजामध्ये अनेक सामाजिक बदल घडून यावे, रूढी, परंपरा, अंधविश्वास विषयी जनजागृती व्हावी यासाठी भारतातील लहान लहान विभागांमध्ये, तळागाळात साप्ताहिके, मासिक,वृत्तपत्रांची निर्मिती झाली. त्याकाळी बातमी लिहीत असताना बातमी निष्पक्ष असत. व बातमीत सत्यता, वस्तुनिष्ठता, पारदर्शकता, संवेदनशीलता  या महत्वाच्या मूल्यांचा वापर केला जात होता. कारण  पत्रकारांवर कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व नसावे व बांधिलकी नसावी. ही भूमिका आपल्याला स्वातंत्र्यपूर्व पत्रकारितेमध्ये दिसून येते. 

परंतु…आपल्याला सध्याचे पत्रकारितेचे चित्र हे पूर्वीच्या पत्रकारितेपेक्षा उलट दिसून येते. सन २०१४ पासून भारतातील सत्ताधारी पक्षाला देखील एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाने ओळखले जाते आहे. काही वेळा पत्रकारिता देखील पत्रकारितेच्या मूल्यांचे उल्लंघन करताना स्पष्टपणे दिसून येत. आजच्या पत्रकारितेमध्ये समाजामध्ये नेमके काय चालले आहे,  हे दाखवले जात नाही. देशात दर दिवसाला संविधानिक मूल्यांचे मानवी अधिकारांचे हनन होताना दिसते. देशात मॉब लिंचिंग सारखा प्रकार घडून येत आहे. आणि यात पत्रकरांची भूमिका असावी टी दिसून येत नाही.   हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही आतंवादि  म्हंटले जात आहे. बलात्कार, बालविवाह, स्त्रियांवरील हल्ले रोज मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. देशाचा पंतप्रधान मोठ मोठे आश्वासन देतो, विश्वास देतो, पण मानव हितावर आधारित कोणतेच काम करत नाही. सामान्य जनता आवाज एक करून प्रश्न विचारते, उत्तर मागते पण पत्रकारीतेची भूमिका आपल्याला दूर दूर दिसत नाही.  

आणि यातून कळून येते की आजची पत्रकारिता ही मोठमोठ्या नेत्यानं , त्यांच्या पक्षाला विकली गेली आहे. आणि म्हणून ते सत्य लिहिण्यास, सत्य मांडण्यास, सत्य बोलण्यास घाबरत आहे. आणि तोंडांळा कुलूप लाऊन अर्णब गोस्वामी बनत आहे. आणि  मुख्य प्रश्नांवर बोलणारी पत्रकारिता कुठेही दिसत नाही. हीच माझी खंत !

जाहिरातांनी आजची पत्रकारिता खाऊन टाकलीय. आणि पत्रकारीतेचे बाजारीकरण करून ठेवलय

– काजल बच्चे

मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.