संत नाम घ्यावे गोड हरी गुन गान, संतवासाने पवित्र ही महाराष्ट्र भूमी वाढवी शान….
घेऊनी ध्यास मनी संतांचा होईल जीवनाचा उद्धार, मज कळाले संत ऐकोणी होई ज्ञानाचा प्रसार।
संत जसा निळाक्षार समुद्र, ज्यात वेदना प्रेम जिव्हाळ्याचा सार, संत मुखी गोड अभंग ज्यात साठले ज्ञान अथांग।
कंटाळूनी समाजाच्या जाचाला ज्ञानेश्वराच्या मात -पिताने केला देहत्याग,
तरी हा कठोर हृदायी समाजाला नाही फुटला मायेचा पाझर।
माहिती असूनही ज्ञानाला हा समाज निष्ठूर, मनी नाही ठेवला द्वेष, प्रेम केले भरभरून
भरकटलेल्या समाजामुळे स्वतःला नको व्हायला कठोर भाऊ-बहिणी सांभाळत केला अमृत विज्ञानाचा प्रसार।
कोवळ्या वयात होती अफाट विवेकशील बुद्धी त्याची,
होते वेदपठण त्यांच्या तोंडी,
कर्मठ ब्राह्मणांच्या अहंकारापायी, म्हणून घेतली रेड्याच्या तोंडून वेदवाणी।
ज्ञाना म्हणे अंगी चिटकून नको अहंकार,
गर्व द्वेष राग हे ज्ञानापुढे होतील क्षणभंगुर।
कर्मकांडयाला तिलांजली देऊन, घ्या नाम हे प्रभुचे होईल ।
होता ज्ञाना एवढा तेजस्वी संत, योगशक्तीने पाठीचा तवा केला ज्वलंत।
जरी झुकावे लागले होते समाजापायी,
त्यांनी त्याचा मार्ग ज्ञानप्रसाराचा कधी सोडला नाही ।
– किरण कांबळे