‘Happy Women’s Day’ ❤️
प्रिय…….
तुला जागतिक महिला दिनाच्या
अनंत सदिच्छा….
तु माझी बायको, साथी – सोबती, Girlfriend यापेक्षा एक स्त्री म्हणून तुझ्याबद्दल माझ्या मनात आदर आहे आणि कायम असेल….
कितीही बोललों, रागावलो तरी तू माझ्यासाठी खुप Special आहेस…
तुझ्या इतकच प्रत्येक स्त्री चा,
आदर, सन्मान मी नेहमी करेन…
तुझ्यावर पुरुषी अहंकार, हक्क न गाजवता तु घेतलेल्या
प्रत्येक निर्णयात, संकटात
मी तुझ्या सोबत असेन…
तुला प्रेमाने मिठीत घेताना Romantic नवरा होईन, जेव्हा तुला गरज असेल तेव्हा समजूतदार मित्र होईन, तुझ्या सोबत चालताना भावासारखा
भक्कम आधार होईन..,
तुझ्या प्रत्येक दुःखात, तुला आधार देणारा हक्काचा खांदा होईन..,
तू लढ तुझ्या ध्येयासाठी,
अन उत्तुंग स्वप्नांसाठी…
क्षितिजा पल्याड झेप घेताना
या समाजाच ओझ तु
अजिबात बाळगू नकोस..,
तुला तुझ आयुष्य तुझ्या पद्धतीने
जगण्याच पूर्ण स्वातंत्र्य आहे….
Periods च्या काळात तुझी काळजी घेण्यापासून, गर्दीत विस्कटलेला तुझा ड्रेस,चेहर्यावर आलेली केसाची बट सुद्धा अगदी निसंकोच ठीक करेन.., आज एक दिवस नाही वर्षाचे 365 दिवस तुझा तितकाच आदर करेन…
तु जग तुला हव तस, जस
सगळ्यांसाठी जगते तस..,
आयुष्य खुप सुंदर आहे, कुणाच्या हातची बाहुल बनूच नकोस, तुझी तु समर्थ आहेस,
तुझ्या स्वप्नांचा सह्याद्री गाठायला…
आज तुला नाव ठेवणारी तोंड उद्या त्याच तोंडाने तुझ कौतुक करतील बघ, तू फक्त सिद्ध कर स्वतःला….
तुझ आयुष्य आहे अन त्यातला प्रत्येक दिवस तुझा आहे…
फक्त आज नाही वर्षातला प्रत्येक दिवस तुझ कौतुक व्हाव,
तुझा आदर व्हावा, सन्मान व्हावा,
आणि हे तू Deserve करतेस….
प्रिये स्वतंत्र आहेस तू…
तु फक्त भरभरुन जग….
जगाचा विचार नकोस करू….
Love You So Much!
तुझ्या त्यागाला, संघर्षाला,
धाडसाला, जिद्दीला
माझा मनापासून सलाम…
– गंगप्पा पुजारी