येभी किसी कड़वे सच से कम नही,
नेताओ को भूख कुछ कम नही,
जनता के खुशियों का खून अभी बस नही,
अवाम है वहम में ज़िंदा क्या ये कम नही,
चैन से खा पी न सके और खुल के जिये नही,
ये आज़ादी क्या किसी गुलामी से कम नहीं?
~ शाकिर हूसेन
हा है वो दस्तावेज दुनिया के विपरीत
जो हमें हमारी सिद्धता मांगती है,
न होने देंगे हम कभी हमारे
मुल्क का बटवारा जो वो चाहते है।
कोई कह रहा होगा इसे
मजहब की लड़ाई,
कोई देता भी होगा गवाई,
बस तू इसे वो मत समझना,
जो वो समझाना चाहते है।
ये मेरे दोस्तों तुम इसे
धरम का झगड़ा मत समझना,
तुम मत समझना इसे वो दंगा,
जो आंधी की तरह सबको समेटता है।
हाथ में उनके भलेही बन्दुक हो,
तू पत्थर और काठी कभी न उठाना,
हमारी एकता, मानवतावाली इंसानियत को
कभी न झुकने देना।
उनकी तो सोच ही है हमारा बटवारा,
पोलिस की डंडी, गोली और अश्रुधूर का मारा,
बस तू सोचना जरा गहरा और कहना
यह देश हे हमारा।
ये मेरे दोस्तों ये अभी भी कहेंगे
मजहब और धरम का मुल्क बनता है,
तुम उसे हसकर कहना, ये मेरे दोस्तों
हम तुम्हारे सभी भेदभाव को मुहतोड़ जवाब देंगे।
मुल्क की धर्मनिपेक्षता के लिए….
~ प्रविण सुनीता रतन बोरकर
वैसे तो हम सभी बचपन से स्कूल के दिनों से ही देशभक्ति के बारे मे सुनते आए है। हमारे अंदर भी यह देशभक्ति १५ अगस्त स्वतंत्र दिन और २६ जनवरी गणतंत्र दिन पर ही उत्पन्न होती है। पर बाकी के दिन हमारा और देश का कुछ संबंध नहीं होता। हमें देश के प्रति या एक जिम्मेदार नागरिक होने के कारन हमारी जो जिम्मेदारी होती है, उसे हम हमेशा ही भूल जाते है। पर घर मे बैठकर आपस में, “ये नेता सही है, और ये नेता गलत है” इन मुद्दों पर पूरे जोरो से टिपनी करते रहते है। खैर छोड़ो ये सब! अभी २६ नवंबर “संविधान दिन” आ रहा है। हम सबको पता है, इस दिन हमारे देश का संविधान यानी कानून पूरे देशभर लागू हुआ था। और ये संविधान बनाने के लिए जिन लोगों ने सहयोग दिया था, उन्हें हम “देशप्रेमी” या “देशभक्त” समझते है। मैं भी अबतक जिन्होंने देश के निर्माण या विकास के प्रति अपना योगदान दिया है, उनको ही देश भक्त समझता था। पर अब शायद लगता है की, आज की Definition of देशभक्ति बदल गई है!
२०१४ मे देश से काँग्रेस सरकार चली गई। और बीजेपी सरकार पूर्ण बहुमत से चुनकर आयी। और फिर क्या? जो कुछ हम सोच भी नहीं सकते थे, वो सब हमारे साथ सबसे बड़े लोकतान्त्रिक देश मे होने लगा। हमे अब “तानाशाही” क्या होती उसकी पहचान “अच्छे से” होने लगी है। हमे राष्ट्रवाद, हिंदुराष्ट्र, आत्मनिर्भर, विकास, मन की बात, मोदी है तो मुमकिन है! ऐसी सभी झूठी बाते जोर जोर से चिल्लाते हुए बताकर बेवकूफ बनाया जा रहा है की, यह सब दकियानूसी बाते स्वीकार करने वाला व्यक्ति देशभक्त है। मतलब बीजेपी सरकार या मा.पंतप्रधानजी जो कहेंगे उसका स्वीकार करनेवाला ही “देशभक्त” होता है। फिर चाहे वो देश के लिए कितना भी गलत साबित क्यों न हो।
जैसे की हम जानते है, इस सरकार ने कोई भी नियोजन किए बगैर ही अचानक से डिमॉनीटायजेशन (नोट बंदी) का निर्णय लिया और उस वजह से सभी लोगों का काफी नुकसान हुवा। और जो लोग इस गलत निर्णय का विरोध कर रहे थे। तो ये सरकार जनता को Manipulate करने के लिए सियाचिन मे जवान दिन रात लढ़ रहे है, और हम सिर्फ पैसे निकालने के लिए कुछ घंटे एटीएम के लाइन मे खड़े नहीं हो सकते। इस तरह से नागरीको के देशभक्ति पर सवाल उठाया जाता है। और फिर हमारी जनता इस सरकार को अपनी देशभक्ति साबित करने के लिए सवाल नहीं करती।
जब कुछ जागृत युवा या विद्यार्थी देश के हित मे इस सरकार के तानाशाही का या गलत निर्णयों का विरोध करते है। तो यह सरकार उन्हे देशद्रोही कहती है। इतना ही नहीं अब तो सरकार से इन जागृत नागरिकों को लिए ‘अर्बन नक्षल’ बोलने का ट्रेंड चल रहा है। और दूसरी तरफ जो लोग देश मे धर्म के नाम पर द्वेष फैला रहे है, पर सिर्फ वो बीजेपी के समर्थक होने के वजह से उन्हे देशभक्त कहा जाता है। डॉक्टर काफ़िल जैसे जिम्मेदार डॉक्टर ने बहुत से बच्चों की जान बचाई, पूरे ईमानदारी से अपनी जिम्मेदारी निभाई थी। उसके बदले मे उनको इस सरकार ने अवार्ड से सम्मानित करने की जगह पर झूठे चार्ज लगाकर जेल मे बंद कर दिया। आगे जाकर बीजेपी सरकार ने डॉक्टर काफ़िल हिन्दू मुस्लिम मे द्वेष पैदा कर रहे है, देश के सिक्युरिटी को खतरा है ऐसे आरोप लगाकर NSA (National Security Act) के तहत फिर से जेल मे कैद किया और जनता के सामने उन्हे देशद्रोही साबित किया। जब की वो सच्चे देशप्रेमी है।
हम जानते है CAA और NRC यह कानून नागरिकों के हित मे नहीं है। इसकी वजह सिर्फ हिन्दू मुस्लिम मे द्वेष बढ़ेगा। इस कानून का पूरे देश मे जनता विरोध कर रही है। फिर भी यह सरकार जबरन यह कानून लागू कर रही है। और जो इसका विरोध कर रही है उसे देशद्रोही बताकर जेल मे बंद कर रही है। और इस कानून का कुछ लोग समर्थन कर रहे है उनको देशभक्ति का खिताब दिया जाता है।
हमारा देश ‘धर्मनिरपेक्ष’ है मतलब की देश का कोई धर्म नहीं और देश कोई एक धर्म को बढ़ावा नहीं देगा। देश के लिए सभी धर्म समान है। फिर भी यह सरकार इस देश को ‘हिन्दू राष्ट्र’ बनाने का संकल्प कर चुकी है, जो की संविधान विरोधी है। जो लोग इसका विरोध करते है, तो उन लोगों को भी देशद्रोही बताया जाता है। और जो इसका समर्थन करते है, उनको देशभक्त कहा जाता है। शायद हम अबतक समझ ही गए होंगे। अबकी देशभक्ति की व्याख्या बीजेपी सरकार तय कर रही है। इनके हिसाब से सिर्फ जो सीमा पर लढ़ रहे है वो देशभक्त और जो इनका समर्थन करते है वो देशभक्त। इन लोगों को छोड़कर बाकी पूरी जनता देशद्रोही है।
मेरे नजरिये मे भक्ति किसी भी चीज की हो अंत तक वो गलत ही साबित होगी। चाहे फिर वो धर्म की हो, देश की हो, किसी राजनैतिक पार्टी की हो, या किसी व्यक्ति की! क्योंकि जब हम भक्त बन जाते है, तो हम हमारे विवेक बुद्धि का उपयोग करना छोड़ देते है। किसी भी चीजों पर , बातों पर या व्यक्ति पर अंधविश्वास रखते है। उसको किसी भी तरह खुद जाँचते नही। मेरा सभी देश के नागरिकों को आवाहन है की, हमे किसी भी पार्टी के नेता के झांसे मे आना नहीं है। उनकी भक्ति नहीं करनी है। हमे हर बात को अपनी विवेक बुद्धि का उपयोग कर किसी पर भी अंधविश्वास रखे बगैर जाँचना पड़ेगा, परखना होगा और देश के विकास के लिए जो काम करे उसका समर्थन करना होगा, न की मंदिर मस्जिद , धर्म-राष्ट्रवाद की बात करने वाले का। और कोई भी हमे अपनी देशभक्ति साबित करने के लिए कहे तो कोई जरूरत नहीं किसिको भी साबित करके दिखाने की। और हमे इनको सवाल करना होगा, मेरा देश के प्रति देशप्रेम है या नहीं इसका परिमाण पूछने वाले तुम होते कौन???
~ विशाल पुष्पा पद्माकर जाधव
(सीपीडी साथी)
आपल्या भारत देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी ठरली आहे, हे आपण सर्वजण बघत आहोत. आणि याची दखल अगदी सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. या मध्ये खारीचा वाटा भारत निवडणूक आयोगाचा असून देशातील लोकांनी दिलेली साथ आणि विश्वासाच्या जोरावर ही मतदानशाही टिकून राहिली आहे. त्यामुळे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल करून देशाला बलाढ्य बनवण्याचा संकल्प सुरू झाला. अशा या भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. म्हणून आपण हा दिवस देशभर ‘राष्ट्रीय मतदार’ दिवस म्हणून साजरा करतो. मतदानाचा हक्क मिळवून देणारे भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान मानले गेले आहे.
देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे त्यामुळे राजाने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावत आलेला आहे. परंतु जसे जसे वर्ष सरत गेले, वेगवेगळे पक्ष आले, त्यांनी आपले उमदेवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. व त्यातील काही जिंकूनही आले. पण जिंकून आल्यानंतर जेव्हा विकासाच्या योजना वस्तीत गल्लोगल्लीतील प्रत्येकाला मूलभूत सुविधा जसे राहण्याचा, पाण्याचा, अन्न सुरक्षेचा, आरोग्य आणि शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचे काम निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे असते. परंतु असे होत नाही. कारण लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून वेगवेगळी कारणे दाखवून जनतेला मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जाते. मग असा प्रश्न पडतो की, लोकशाही नक्की कुठे आहे!
लोकशाहीचा आधारस्तंभ हा मतदार राजा आहे. पण हा राजा फक्त मतदानाच्या दिवशी लोकप्रतिनिधिना आठवतो. याच्यातही खूप तफावत आहे. देशात अनेक राज्य, शहरे, गाव आहेत, त्यातील काही वस्त्या अधिकृत तर काही अनधिकृत दाखवुन शासन आणि प्रशासन लोकांमध्ये भेदभाव निर्माण करू पाहते असे स्पष्ट दिसते. याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर पी/ नॉर्थ वार्ड मालाड येथील मालवणी अंबोजवाडी ही वस्ती अगदी सन 1994 पासून या विभागात आहे. तरीही मूलभूत सुविधा पासून अजूनही वंचित आहे. कारण ह्या वस्तीची महानगरपालिकेच्या डेव्हलमेंट प्लान मध्ये अनधिकृत म्हणून नोंद आहे. हे फक्त अंबोजवाडी पुरते मर्यादित नाही! तर वेगवेगळ्या शहरातील, गावातील काही भाग विकासाच्या बाबतीत मागे ठेवला गेला आहे. त्याचे कारण असे की, त्या भागातील लोकांचे मतदान, निवडणुकीच्या दिवशी अधिकृत होते आणि निवडणुकी नंतर अनधिकृत होते. मग प्रश्न पडतो की, लोकशाहीतील मतदानशाही जिवंत आहे का? की फक्त तानाशाहीतील लोकांसाठी बांधून दिलेले पैसे कमवायची शिडी. आता तर ईव्हीएम मशीन वर सुद्धा लोकांचा भरवसा राहिला नाही. कारण आताच झालेल्या बिहार निवडणुकीत चुरशीचा सामना बघायला मिळाला. यात एनडीए आणि महाआघाडी असे दोन बलाढ्य पक्ष दिसले. सुरुवातीला महाआघाडी पुढे होती नंतर जसजसे मत परिवर्तन होत गेले तसतसे महाआघाडी खाली येत गेली. आणि एनडीए पुढे गेले. असे चित्र बघून ईवीएम मशीन बरोबर काहीतरी छेडछाड केली असावी. असा संशय आल्या शिवाय राहत नाही. पण बिहार ला नवा नेता भेटला असे म्हणायला हरकत नाही. म्हणून लोकांच्या हितासाठी, विकासासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी बॅलेट पेपर ची मागणी सुरू केली पाहिजे. आपण सर्वजण यावर नक्की विचार कराल आणि लोकशाहीला अभिप्रेत असलेली सर्वांना समान मत देण्याची संधी अबाधित ठेवाल आणि सुजाण नागरिक बनण्याचे कर्तव्य पार पाडाल.
आपल्याला लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानशाही टिकवून ठेवली पाहिजे आणि सर्वांगीण विकास कसा होईल या साठी एकत्र येऊन संविधानातील अधिकार मिळवले पाहिजे. जे लोकप्रतिनिधी, सरकार, महानगरपालिका फक्त मतदानाच्या दिवशी एखाद्या वस्तीला, शहराला, गावाला अधिकृत समजतात आणि मतदाना नंतर अनधिकृत घोषित करतात. अशा लोकांना मतदानाच्या एक्यामधून दाखवुन दिले पाहिजे.
लोकशाही… या वाक्यात लोकांचं हित लपलेलं आहे. आणि ते मतदानाच्या जोरावर उभ आहे. हल्ली विधानसभा असो वा लोकसभा या मध्ये जो पक्ष मोठा असेल किंवा त्यांचे आमदार, खासदार यांची संख्या जास्त असेल तर धोरण, नीती बनवण्याचा अधिकार जणू राखून ठेवलेला असतो. मग यात विरोधी वाले कितीही ओरडले. धोरणातील चुका दाखवुन दिल्या, त्यांना बाहेर काढले जाते. अशा घटनेला आपण लोकशाही विरोधी का म्हणू नये. जर कोणतेही धोरण बनवले जाते यात जर काही चुका असतील आणि त्या लोकांच्या हिताच्या नसतील तर त्या दुरुस्त करायला हव्यात आणि एकमताने निर्णय घेऊन लोकांच्या हितासाठी चांगला निर्णय घेतला पाहिजे.
मग माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना आवाहन करतो, लोकशाही बळकट करण्यासाठी उमेदवाराची निवड करताना त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचा इतिहास, आणि त्याची काम करण्याची इच्छा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण तरुण विचाराने पुरोगामी वारसा घेऊन संविधानाचा जागर करत स्पष्टपणे आपले मत मांडत राहू. आणि लोकशाहीतील मतदानशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन बदल घडवून आणला पाहिजे. कारण आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचे आहे.
~ बाळा कमल सुंदर आखाडे
लॉकडाउन से पहले :– लोगों का शहर में रोजगार के लिए आना जाना लगा रहता था। गरीब हो या अमीर हो लोग घर में बैठते नहीं थे। छोटे से छोटे बड़े से बड़े लोग रोज काम करते। दिन रात बस, ट्रेन, रिक्शा,दुकान,होटल, अस्पताल,स्कूल,कॉलेज सब कुछ चालू रहता था। लोग खुली साँस ले रहे थे । दिन भर देश चालू रहता था । लोग अलग अलग देशो से सिर्फ रोजगार के लिए आते है। गांव से शहर और शहर से गांव आते जाते थे । बहुत से मजदूर अपना परिवार का पालन पोषण करने के लिए अपने परिवार से दूर काम धंधे के लिए आते थे, और काम करके पैसे कमा कर सालो बाद अपने परिवार से मिलने जाते थे। देश हमेशा चालू रहता था। किसी ने भी कभी सोचा नहीं होगा की, हम सब इस खतरनाक दौर से गुजरेंगे। जब हमारे देश मे भी कोरोना महामारी का वायरस फैलने लगा। पूरी दुनिया के साथ साथ हमारा जीवन और हमारा जगमगाने वाला देश एकदम से ठप हो गया! हमारे जीने का तरीका एकदम से बदल गया जब अपने देश मे भी लॉकडाउन चालू हुवा।
लॉकडाउन में :- लॉकडाउन की शुरुआत कोरोना महामारी के कारण हुई है। कोरोना महामारी की शुरुआत २०१९ में चीन के एक छोटे वुहान शहर से हुयी। धीरे-धीरे हर देशो में कोरोना वायरस फैल कर कोरोना पॉजिटिव मरीजो के आंकड़े बढ़ने लगे। लाखों लोग मरने लगे। जिसके कारण सरकार ने अपने देशों मे कोरोना महामारी फैलने से रोकने के लिए लॉकडाउन का एक जरिया बनाकर अपने-अपने देश मे लागू किया। २२ मार्च से देश मे लॉकडाउन की शुरुवात हुयी। दुनिया जैसी ठप सी हो गई। एकदम से बंद हो गई! लोग अपने घरों में बंद हो गए! काम -धंधे बंद हो गए! लॉकडाउन में रेलवे, बस , टैक्सी , ऑटो सब बंद हो गए। लोगों का बाहर निकलना मुश्किल हो गया। लोग अपने ही घर मे बंद हो गए, जैसे परिंदे पिंजरे मे बंद होते है। सभी के काम-धंधे छूट गए। लोगो का पगार आना बंद हो गया। जो लोग काम पर जा रहे थे, उनको काम से निकाला गया।
कोरोना महामारी के वजह से बहुत से लोग बेरोजगार हो गए। लोग एक दूसरे से मदद मांगने लगे। कोई ब्याज से कर्जा निकालने लगा, कोई गहने बेचने लगे, कोई रोज दुकान से उधार सामान लेकर जी रहा था। लॉकडाउन के कारण बेरोजगारी इतनी बढ़ गई कि लोग भूखे मरने लगे । एक टाइम का खाना कहा से मिल जाए यह लोग सोचते थे। बहुत से लोग भूखे सो जाते थे अपने परिवार के साथ। रास्ते पे रहने वाले लोग कचरे के डिब्बे से निकालकर खा रहे थे । बोहोत से घरो में एक वक़्त का चूल्हा जलता था। पूरी रात भूखे सोना पड़ता था। बहुत से लोग पानी पी कर गुजारा कर रहे थे। लॉकडाउन में लोगों की हालत इतनी बदतर हो गई थी। बोहोत से लोग आत्महत्या करने की सोच तक पहुँच गए। लोग भुखमरी से मरने लगे थे।
लॉकडाउन और भुखमरी के वजह से न मर जाये इस सोच को लेकर कुछ मजदूर साथियों ने अपने अपने गाँव जाना तय किया। पर रेल गाड़ी, बस,टैक्सी ,ऑटो की सुविधा न होने कारन मजदूर साथियों ने पैदल चल कर गाँव जाना तय किया। सभी मजदूर मध्यप्रदेश के थे। और जालना में स्टील कंपनी में काम करते थे। औरंगाबाद से 40 किलोमीटर चलकर पैदल जा रहे थे अपने गांव मध्यप्रदेश। सड़क से चलकर घर जा रहे ,थे तो पुलिस रोक रही थी। इस वजह से वह मजदूर रेलवे पटरियों से चलकर अपने गांव जा रहे थे। चलते- चलते थक गए,अंधेरा भी काफी हुवा था। लॉकडाउन के कारण ट्रेन बंद है यह सोच कर सभी साथी पटरियों पर सो गए। और फिर अचानक से मालगाड़ी उसी पटरी से गुजरकर उनके ऊपर से चली गई। इस हादसे मे 16 मजदूरों की मृत्यु हो गई। शुक्रवार 8 मई को यह हादसा हुआ। बेरोजगारी और भुखमरी के कारण लोग अपने अपने शहरों और गांव कई किलोमीटर चलकर जाने लगे। मजदूरों को मुंबई में खाना और काम नहीं। तो वो लोग पैदल चलकर अपने अपने गांव जाने लगे। लोगों को यह लगा कि वह भूखे मरने से अच्छा अपने परिवार के साथ रहेंगे और उधर मर जायेंगे। जो लोग मेहनत करके खाने वाले थे उनके ऊपर बेरोजगारी के कारण भीख मांगने की नौबत आ गई थी। काम -धंधे बंद होने के वजह से लोगो का मानसिक तनाव बढ़ गया। काम -धंधे न होने के कारण लोगो को गुस्सा आने लगा। लोग अपने घरों में झगड़ा करने लगे मारपीट करने लगे। घरो में पति – पत्नी में झगड़ा होने लगा मारपीट होनी लगी। लॉकडाउन और बेरोजगारी के वजह से घरेलू हिंसा (Domestic Violence) ज्यादा बढ़ने लगा।
१९ मई मंगलवार बांद्रा टर्मिनस से मजदूरों को गांव जाने के लिए ट्रेन निकलने वाली है ऐसा कॉल उनके नियर पुलिस स्टेशन से आया था। पर अफसोस यह सिर्फ अफवा थी। जिसके वजह से मजदूर बान्द्रा टर्मिनस के बाहर सुबह से भीड़ लगा के खड़े थे। लेकिन कोई ट्रेन नहीं छुटी! भीड़ ज्यादा होने के वजह से पुलिस मजदूरों के ऊपर लाठी चार्ज करने लगी। लोगो को भगा – भगा के मार रही थी। फिर मजदूरों ने भी स्टेशन के बाहर बैठ के नारे बाजी और आंदोलन करना शुरू कर दिया। लॉकडाउन और बेरोजगारी के कारण लोगों की यह स्थिति हो गई थी। लेकिन सरकार सही तरीके से फैसला नहीं ले पा रही थी। सरकार लोगो को सही तरीके से राशन मजदूरों को खाना नहीं पहुंचा पा रही थी। सरकार लोगो को सही तरीके से सुविधा नहीं दे पा रही थी । लॉकडाउन के कारण आफिस में काम करने वाले लोग दिहाड़ी काम करने लगे है। काम न होने के वजहसे अच्छे – अच्छे जगहों पर काम काने वाले लोग दिहाड़ी काम करके अपना परिवार संभाल रहे है।। । बोहोत से गांव में शिक्षक काम न होने के कारण मनरेगा (MANREGA -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंट अधिनियम) का काम करके अपना गुजारा कर रहे है। करोड़ो लोग लॉकडाउन के वजहसे बेरोजगार हो गए है।करोड़ो लोगो के नौकरियो पर काले बादल मंडरा रहे है। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमी (सीएमआईई) ने कहा है कि, कोविड-19 लॉकडाउन के चलते देश मे बेरोजगारी की दर 24 मई के सप्ताह के दौरान बढ़कर 24.3 फीसदी रही। पिछले सप्ताह बेरोजगारी की दर 24.01 फीसदी थी। मार्च में बेरोजदारी दर 8.8 थी। कोरोना वायरस का असर भारत की अर्थव्यवस्था पर हुआ। लोग बेरोजगार हो चुके है।
अब अनलॉकडाउन की प्रक्रिया जारी है, लेकिन इसका सीधा असर भारतीय अर्थव्यवस्था पर पड़ता नजर आ रहा है। इस बीच आरबीआई ने एक और चिंताजनक खबर दी है, भारतीय रिजर्व बैंक के एक अधिकारी ने कहा की चालू वित्त वर्ष की दूसरी तिमाही यानी जुलाई से सितंबर में देश की जीडीपी एक साल पहले की तुलना में 8.6 प्रतिशत अनुमान हुआ। देश मे अनलॉक हुआ है फिर भी बेरोजगारी अभी भी कम नहीं हो रही है। सरकार को सही से नीतियां बनानी चाहिए, जिससे हमारी अर्थव्यवस्था फिर से सही होकर सबको रोजगार मिल पाए।
~ रुकसार खान
मी आहे आजची स्री,
बाबांची लाडकी जराशी बोलकी।
तशी तर मी आहे भारतमाता,
पण खात आहे शब्दांच्या लाथा।
श्वास मोकळा मलाही आवडतो,
काही वेळेस तोच मनात भिती दडवतो।
नको मला भावाची जागा,
मुलगी म्हणुनी जरा माझ्याकडे बघा।
दुनियादारीत थोडीशी कच्ची आहे मी,
तरी सुध्धा आई बाबांची बच्ची आहे मी।
मोठ्यांचा ओरडा, छोट्यांची जबाबदारी,
स्वतःचे अस्तित्व शोधत आहे दारोदारी।
नको मला पैसा बंगला आणि गाडी,
हवी आहे मला मनात तुमच्या गोडी।
आवडी आहेत माझ्याही खुप,
संसाराच्या उन्हात झाल्यात कुरूप।
माहेरची जात नाही ओठ,
सासरघरची भेटत नाही जोड।
स्वप्न आहेत माझेही मोठे,
पण मुंलापुढे आहेत छोटे।
ना मी तुमच्या पूढे ना पाठी,
चालूयात सोबत आयुष्याच्या वाटी।
ऐकच आहे माझे आवाहन,
करू नका माझा अपमान,
हवा आहे मला फक्त सन्मान।
~ सतीश निकाळजे
“भेदभाव यह शब्द हम कई बार सुनते है और कई बार दोहराते भी है, यह शब्द हम सभी के निजी जीवन से जुड़ा है यह हम सभी को पता है। पर फिर भी हम इस जुड़ाव को अनदेखा करने की कोशिश करते आये है। क्या कहना चाह रही हु कुछ समझ आये तो बताना ज़रूर!
हाल ही में हुवा एक किस्सा सुनाती हु। शारदा नामक मेरी दोस्त है। वो नेरुल में एक आदिवासी पाडा (बस्ती) में रहती है। २५ मार्च से पूरा भारत कोरोना महामारी के चलते ठप्प हुवा है। हालांकि २०१४ से ही हमारे देश का सारा सिस्टम सही से काम करना बंद हो चुका है। पर अब भारत की जनता , कामकाज ,सुविधाए ,रोजगार आदी की स्थिति बिकट है। तो शारदा मेरी दोस्त अपने ३ बच्चे, (एक बेटी और २ बेटे ),पति और पिताजी के साथ जैसे आप सभी मानते है की स्त्रियों को अपना घर संभालते रहना चाहिए वैसे रहती है। २५ मार्च से कोरोना वाली महामारी शुरू हुई और lockdown की वजह से शारदा के पति का और शारदा का काम बंद पड़ा। कोई भी घर से बाहर न निकले यह एलान तो हमारी सरकार ने कर दिया। पर शारदा एक घरेलु कामकाजी महिला और उसका पति नाका कामगार और हमारे देश में श्रमिकों के लिए बनाये गए कानून कौन बनाता है ? उस मुताबिक इन दोनों को भी उतना पगार नही की, वे कुछ पैसे उस कमाई से निकालकर भविष्य के लिए बचाए।
एक तो उसका पति पितृसत्तात्मक विचारों का और ऊपर से नशे का अधीन। एक अरसे से इस पितृसत्तात्मक सोच रखने वालो का विश्वास बढ़ता चला आया है, की महिलाये इस समाज मे सबसे कमज़ोर अंग / हिस्सा है। पैसे और काम न होने की वजह से शारदा का पति अपना तनाव अपना गुस्सा शारदा और बच्चो पर निकालने लगा। जब शारदा ने उसके खिलाफ पुलिस में शिकायत करनी चाही तो पुलिस उसे कहने लगी की ये आपके घर का मुद्दा है आप घर में सुलझा लीजिए। इस तरह से घरेलू हिंसा के एक और शिकायत को अनदेखा किया जाता है।
दोस्तों यह केस आपको मैंने इसलिए बताया क्योंकि आपकी इस पर प्रतिक्रिया क्या है? ये जानना चाहती थी। बोहोत लोग होंगे जिनको यह केस पढ़कर लगा होगा की ये तो आम बात है, और पुलिस ने भी सही ही किया है। यह तो घर की बात है! शारदा को पुलिस में जाकर शिकायत नही करनी चाहिए थी। और कुछ लोग होंगे की जिन्हें महसूस हुवा होगा की शारदा ने सही किया। पुलिस ने शारदा की रिपोर्ट लिखनी चाहिये थी, और पुलिस ने उसके पति ने जो जुर्म किया उसे सजा देने का काम कानूनन करना चाहिए था। और कई लोग ऐसे भी होंगे, जो सोचते होंगे, “पति है उसने मारा तो क्या गलत कर दिया ! यह छोटीसी तो बात है अब पति है गुस्सा आया तो मार दिया होगा उसने। और ये हमारे देश ,बस्ती ,मोहल्ले के हर दुसरे घर में होता है। हम रोज़ देखते, सुनते, और पढ़ते है, इसमें क्या नया है? खामखा इतना बड़ा रही है यह लडकी इस बात को।
यह जो शारदा के साथ हुवा ये हमारे देश की हर दूसरी महिला के साथ होता आया है और हो रहा है . बोहोत कम ऐसे पुरुष और महिलाये है जो लैंगिक समानता पर विश्वास करते है और इस मुल्ल्य को अपने निजी जीवन में भी पूरी सच्चाई के साथ अपनाते है जुडाव रखते है .राष्ट्रिय महिला आयोग के आंकड़ो के तहत इस महामारी के चलते महिलाओ पर होने वाले हिंसा /अत्याचार का प्रमाण दुगनी तेजी से बढ़ रहा है.२० मार्च से १६ अप्रैल इस दरमियाँ पुरे देशभर में महिलाओद्वारा ५८७ शिकायते दर्ज की गयी है . जिसमे २३९ केसेस घरेलू हिंसा के है . २७ फरवरी से २२ मार्च तक १२३ कैसे हुए याने आगेके २५ दिनों में ये आंकड़े +१०० से ज्यादाकेस की बढ़ोतरी हुई . यह दर्ज हुए केसेस है जो सामने आये है शारदा जैसे ऐसे कयियो केसेस है जिन्हें पुलिसे नही दर्ज करती या फिर समाज क्या कहेगा इस डर से दर्ज नही किया जाता तो सोचो ऐसे कई केस होंगे जिसमे रोज़ महिलाये जलाई जाती है उनको मारा जाता है उनके सपने कुचले जाते है उनकी आवाज़ दबाई जाती है .
ये सब तो घरेलु हिंसा और महिलाओं पर हुए सामाजिक पारिवारिक हिसा के आंकड़े . महामारी जब से शुरू हुई तब से हमारी सरकार जिसे शायद हम ने चुनकर दिया और वो सत्ता में आई इस सरकार ने और ही अच्छे काम किये . मुंबई एक ऐसा शहर है जो देश के अलग अलग हिस्सों से आये हुए लोगो ने और श्रमिकों ने बसाया है और इस शहर को अपनी मेहनत से सजाया है. जिसमे कई महिलाये अपने परिवार के साथ यहाँ पर रोज़गार पाने की आशा लिए यहाँ इस शहर में आये और बस्तियों में घर किराये पर लेकर अपनी रोज़मर्रा की जीवन की जरूरते पूरी कर रहे थे.
३० जनवरी २०२० को कोरोना का पहला मरीज हमारे भारत देश में पाया गया तबसे १८ मार्च तक हमारे प्रधानमंत्री जी ने कोरोना के सम्बंधित कोई भी निर्णय नही लिया और अचानक से १९ मार्च को वे घोषणा करते है की पुरे भारत में २२ मार्च को जनता कर्फ्यू रखा जाएगा कोई बहार न निकले. अब होता क्या है जन देश में कोरोना के ५०० से अधिक केस बढ़ते जाते है तब वे आकर २४ मार्च को २१ दिन का lockdown की घोषणा करते है .जनता के हित को सामने रखते या कोई भी तयारी (जनता के लिए) न करते हुए देश भरमे lockdown शुरू हुआ. और ये lockdown मरीजो के बढ़ते आंकड़ो के तहत बढ़ता चला गया.
पितृसत्तात्मक विचारधारा ये कई सालो से चलती आ रही है और कुछ इस विचारधारा का समर्थन करने वाले लोग निंदनीय सोच को पीढ़ी डर पीढ़ी आगे बढ़ाते चले जा रहे है . छोटी चोट्टी चीजो में यह विचारधारा नजर आती है जैसे स्कूल की किताबे भी ये सिखाती है राम आम खा रहा है सुधा बर्तन मांज रही है , या फिर सिर्फ महिलाओं का नौकरी पर जाने से पहले और घर आने के बाद भी घर का काम करना , घर के सारे काम सिर्फ महिलाओ से ही कराया जाना , बड़ो का आदर करना तहजीब से रहना बड़ो के सामने ऊँची आवाज से बात न करना , ढंग के कपडे पहनना , परदे में रहना , पर पुरुषोसे दोस्ती तो क्या बात तक न करना , झुक कर चलना , देर रात याने ७ बजे के बाद घर से बहार न निकलना , ऐसी कई चीजे है जो हम महिलाओ के रोज़ मर्रा के जीवन के अनुभव करते आये है . मै यह नहीं कह रही हु के ये सभी महिलाओं के साथ आज भी हो रहा है . पर हम ये भी झुठला नही सकते के आज भी ५० % से अधिक महिलाएं आज भी इस सोच / विचारधारा से झुंज रही है.
हालांकि ये विचारधारा कई सालो से चलती आ रही है पर इस महामारी के चलते ये और भी ज्यादा उभर कर आती हुई दिख रही है . जैसे जो महिलाये नौकरी पर जाती थी उन्हें वर्क फ्रॉम होम दिया गया था पर लॉकडाउन होने की कारण घर के सारे लोग घर पे थे तो उनका खाना बनाना घर का सारा काम करना बच्चो को संभालना और उसके साथ साथ ऑफिस का काम करना इन सभी चीजों के कारण स्त्रियों को बड़ी कठिनाईया आई है और उनपर शारीरिक और मानसिक इन दोनो ही तरह से लॉकडाउन का बोहोत ही बुरा असर पड़ा है . आखिर कब तक हम इंसान किसी गलत विचारधारा का समर्थन करेंगे और कब तक महिलाओं के अधिकारों का हनन करते रहेंगे ? संविधानिक रूप से इस भारत में जन्मे हुए हर एक व्यक्ति को आज़ादी है . पर जब स्त्रियों की बात आती है तब इस शब्द का या तो अर्थ बदल दिया जाता है या तो इस शब्द का इस्तेमाल करने पर भी उसे संस्कार याद दिला दिए जाते . गर हमें ऐसी विचारधारा से सच में लड़ना है तो यह लड़ाई हमें अपने घर से शुरू करनी होगी तब ही जाकर हम समाज में परिवर्तन ला सकते है.
हमारे स्वयं से शुरुवात करना ज़रूरी है क्योंकि हमारे ऊपर भी इस पितृसत्तात्मक विचारधारा का काफी प्रभाव पड़ा है तो इसीलिए हमें खुदसे शुरुवात करनी चाहिए और मेरी पसंदीदा एक पंक्ति है – दरिया की कसम मौजो की कसम ये ताना बाना बदलेगा तू खुद को बदल तू खुद को बदल तब ही तो ज़मान बदलेगा तो दोस्तों चलो खुदसे शुरुवात करते है. गलत के खिलाफ आवाज उठाना सिर्फ हमारा अधिकार ही नहीं तो समाज के प्रति हमारा कर्तव्य भी है तो चलो आज़ाद इस शब्द का सही अर्थ जानते है और इन्सान को इन्सान मानते है.
~ लारा पागडे
भारतात घटनात्मक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे तुम्ही तुमचे मत मांडा त्याचे विश्लेषण करा तसेच इतरांचे मत देखील विचारात घेऊन त्याचे विश्लेषण करा. प्रत्येकाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे. आपण आपला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतो त्याप्रमाणे इतरांना देखील संधी प्रदान करावी. न्यायालयात सुद्धा द्विपक्षीय युक्तिवाद ऐकले जातात, थोडक्यात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचे तसेच मत मांडण्याचा अधिकार आहे. संसदीय लोकशाही नुसार निवडणुकीतील संख्येच्या बळावर सत्ता मिळते. आज केंद्रातील सरकार सत्ते मधील अधिक बहुमताच्या जोरावर काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, तसेच एनआरसी आणि सीए.ए.ए. सारखे विधेयके आणून मंजुरी मिळवली जाते. विरोधकांना कस्पटासमान वागवून त्यांच्या मतांचा अनादर केला जातो. एकीकडे ज्या लोकशाहीच्या घटनात्मक अधिकाराने सत्ता मिळवली; तीच घटना सत्तेच्या बहुमताच्या जोरावर फिरवीत असल्याचे दिसून येत आहे.
हुकूमशाही संदर्भात मागोवा घेतला तर सर्वात प्रथम तत्कालीन राज्यव्यवस्था संदर्भात असंतोष निर्माण करणे, लोकांच्या नैराश्य तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेत अराजकता -गोंधळ निर्माण करणे, राज्यकर्ते संदर्भात अनादर निर्माण करणे व जनमत प्रक्षोभित करायचे, संविधाना मध्ये आपल्याला हवे असलेले बदल बहुमताच्या जोरावर करून घ्यायचे अशा प्रकारचं वागणं हे सध्याच्या केंद्र सरकार मध्ये खास करून दिसून येत आहे. एकंदरीत हुकूमशाहीकडे त्याचबरोबर झुंडशाही कडे वाटचाल होताना दिसत आहे.
आज भारतातील अनेक जाती ,विविध पंथ, धर्म, वेगवेगळ्या भाषा, असून सुद्धा एक परिपूर्ण भारतीय म्हणून आपण सोबत काम करत आहोत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र बरोबर धर्माचे आचरण करण्याचे, बोलीभाषा तसेच रोजगार निवडीचे सुद्धा स्वातंत्र्य दिलेले आहे . भारतातील बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजात गायी – बैल बाबत श्रद्धा व देव – दैवत पाहिले जाते. हिंदू धर्माच्या रीतिरिवाज प्रमाणे गोमांस वर्ज्य असून गायीला गोमाता म्हणून पाहिले जाते. मात्र त्याच पशुची हत्या करून त्याचे मांस हे जैन, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचे अन्न आणि रोजगार सुद्धा आहे. पण आज लोकशाहीच्या तत्वानुसार देश चालविणारे बहुमताच्या जोरावर, धर्माच्या नावाखाली या रोजगारावर गोमांस बंदीचा कायदा पारित करून गदा आणत आहेत.
आज देशाच्या हिताच्या दृष्टीने कारभार हाकत असल्याचे भासविले जात असले तरी सत्तेच्या बहुमताच्या जोरावर विरोधकांच्या मताला किंमत दिली जात नाही. घटनात्मक लोकशाही आणि हुकूमशाही ही दोन शासन व्यवस्था आहेत. लोकशाही मध्ये पात्र उमेदवारांची निवड ही निवडणुकीद्वारे व कायद्याद्वारे स्थापित केलेल्या नियमानुसार होते मात्र हुकूमशाही शासन व्यवस्था यामध्ये एक सामर्थ्यवान व्यक्ती किंवा काही शक्तिशाली लोकांचा गट त्यांना अपेक्षित कायद्याद्वारे कोणत्याही परवानगीशिवाय संपूर्ण देशावर राज्य करतात. याचाच प्रत्यय वर उल्लेख केलेल्या दोन उदाहरणावरून हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकशाहीला मानणारा आणि भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अठरापगड जाती, भाषा, प्रांत,धर्म या सर्वांना जोडणारा नागरिक म्हणून भारतीय संविधानातील अखंड भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी या विरुद्ध आवाज उठवूया !!
~ जगदीश पाटणकर
सीपीडी,मुंबई
“धर्माविणा तरणोपाय नाही”, तर दुसरीकडे ”धर्म म्हणजे अफूची गोळी आहे”. भारताला धर्म, धार्मिक श्रद्धा आणि प्रथा या विविधतेने ओळखले जाते. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्र हे निधर्मी आहे तसेच राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहे. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
“ईश्वरी इच्छा” हाच कायदा या सिध्दांताच्या आधारे, धर्मशास्त्र सांगणा-या पवित्र ग्रंथाच्या आधारावर शासन चालवणारे राज्य हे धर्मसत्ताक किंवा धर्मशाही होय. अधिकृत धर्माचे रक्षण व प्रसार करणे हे या राज्याचे प्रमुख कर्तव्य मानले जाते. भारतात जवळ – जवळ सात ते आठ धर्माचे लोक राहतात. (जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, पारशी, शीख) धर्म जो सांगतो तेच खरं आहे म्हणणारे शिक्षित असून अशिक्षित सारखे वागणारे या भारतात खूप लोक राहतात. धर्माचे ठेकेदार मात्र स्वतःच सर्व निर्णय घेत असतात. देव, भगवान, अल्ला, गॉड, अहुर मज्द, अशा अनेक देवाच्या नावाने तसेच धर्माच्या नावावर बाजारीकरण होत असल्याचे मला दिसून येत आहे. प्रत्येक धर्माचे ठेकेदार आपला धर्म कसा वाढेल याकडे पूर्णतः लक्ष देत आहेत.
दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आरत्या. दिवसातून पाच नमाज व महिन्यातून चार नमाज पाडण्याचा हट्ट. आठवड्यातून एकदा चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जाणे व बौद्ध धर्माचे लोक सांगतात कमीत कमी आठवड्यात विहारात एकत्र येऊन सुत्त पठण, महापरित्राण पाठ, बुद्ध वंदना करा. एवढच काय तर गणपती येण्यापूर्वी १५ दिवस तयारी, दहिहंडी येण्यापूर्वी महिनाभर सराव, आला मोहरम त्याची १५ दिवस तयारी, आला ख्रिसमस १५ दिवस तयारी, आली बुद्ध पौर्णिमा १५ दिवस तयारी.
मला आलेले तीन अनुभव, मी आपल्या सर्वां समोर मांडत आहे. २०१५ साली आमच्या “सम्यक” सामाजिक गटाची स्थापना झाली. सम्यकच्या साथिनी एका पडक्या मंदिरात १ ली ते १० वी च्या विद्यार्थांसाठी अभ्यासिका चालू केली. ते मंदिर बांबू आणि प्लास्टिकच्या कागदाचं होत. आम्ही मुलांची मोफत शिकवणी घेत होतो. मस्त सुरळीत चाललं होत. अचानक काही लोक नशा करून येतात . आणि म्हणतात, “ जे काय तुम्ही शिकविणीचं दुकान चालू केलय ते बंद करा” आमची येथे भजनाची जागा आहे. आम्ही येते दर वर्षी गोंधळ घालतो, हे उदगार ऐकून समजलं ते आज धर्माची दादागिरी दाखवत आहेत.
२०१६ साली असचं वस्ती मध्ये जागा शोधतं होतो, बऱ्याच लोकांना जागेसाठी विचारलं. पण कोणीही अभ्यासिकेसाठी जागा देण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी एका सोसायटीला भेटलो. त्या सोसायटीचे कार्यकर्ते आम्हाला बोलले की, “गणपती नंतर तुम्हाला भाड्याने जागा देऊ, मी सहज विचारलं ! काका असं का? गणपतीला अजून २ महिने आहेत, तो पर्यत आम्ही खूप काही शिकवू शकतो. ते बोलंले “आधी आमचा गणपती मग तुमची शिकवणी” हे एकूण पुन्हा वाईट वाटलं. धर्माच्या ठेकेदारांनी पुन्हा कसे गुलामगिरीकडे समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न धर्माचे लोक करत आहेत. हे दिसून आले !
२०१७ साली आम्ही नगराच्या अध्यक्षांना भेटलो आणि बोललो कि, आम्हाला बाबासाहेबांचं भवन (विहार) शिकवणीसाठी द्या. असे पण ते बंद कुलुपात आहे. त्यांनी ही नकार दर्शवला. त्यांचे मत होत तुम्ही शिकवणी घ्याल पण तेथे बाबासाहेबांची मूर्ती आहे, त्याची कुणी विटंबना केली तर ! त्यात काय घडलं तर ! ते फक्त बुद्ध वंदना, १४ एप्रिल आणि गणपती बसवण्यासाठी आहे. या वेळेस खूप वाईट वाटलं डॉ.बाबासाहेबांनी सांगितलं होत कि शिका… संघटीत व्हा… आणि संघर्ष करा… अशा महामानवाच्या नावावर भवन, विहार बंद कुलुपात ठेवली जातात. आणि तेथे धर्म वाढवण्याचे कार्य केले जाते. खरच किती लज्जास्पद गोष्ट आहे !
धर्म हे धर्मामध्ये शर्यत आणि युद्ध लावण्याचा कार्य करत आहे. आपला भारत कोणत्याही धर्मावर चालत नसून तो भारतीय संविधानावर चालत आहे. आपल्या मुलांना संविधान समजावलं पाहिजे. तरी धर्म शिकविले जातात. आपण जर उथळ धर्म शिकविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा भारत गुलामीकडे नक्कीच जाणार आहे. जर आपण सर्व धर्मांचं मर्म असणारं भारतीय संविधान शिकविण्याची भूमिका घेतली, तर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती मध्ये सुजाण आणि सुजक नागरिक घडेल.
~ योगेश राजेश्री रामचंद्र बोले
(सीपीडी साथी)
निरंकुश व्यवस्था मांडनारी ,
हुकूमातील हुक़ूमशाही सत्ते सारखा माज़ करणारी,
निर्दोशांना गलिच्छ राजकारणात बळी पाडणारी,
बुरसटलेल्या विचारधारेला प्रत्यक्षात उतरवणारी ,
अशी ही हुक़ूमशाही !!!
भंग करी….
समानतेच्या मूल्याला,
पण…
जातिय व्यवस्थेला ,
वर्ण , प्रांत भाषेला ,
यौनीक शोषणतेला प्रोत्साहन करी ,
स्त्री-पुरूष-इतर लिंगभावाची हत्या करी,
स्वतंत्रता-बंधुता व लोकशाही चा घात करी ,
अशी ही हुक़ूमशाही !!!
हुक़ूमशाही च्या जोरावर संसदेत मात करुन बिल पास करणारे,
यांचा अजेंडा अटकेपार झेंडा लावतो विकासाच्या नावावर ,
बालमजुरी ते बालविवाह चे बीज पेरणं,
अमानुष अत्यचार करणं,
अशी ही हुक़ूमशाही !!!
लोकशाही लोकशाही म्हणती, तुरुंगात कोंडती ,
बलात्कार करणारे खूनी रस्त्यावर फिरती ,
निर्णय असा घेती नागरिकात फुट पाड़ती ,
रंगाच्या राजकारणात दिशाभूल करती,
मीडियावर चालतों यांचा दबदबा ,
अजुन किती हुकूमशाही वर उडती?
कितीही हल्ले केली तरी हा नागरिक आता शांत नाही बसणार ,
चला एकत्र येऊन क्रांतीची ज्योत पेटवू,
लोकशाहीच्या या राज्यात संविधानाचे मूल्य रुजवू,
हुकुमशाही नको आता चुप्पी तोड़ूया ,
आपणातले सारे भेद विसरूनी
माणसाचे गाणे गाऊया !!!
माणसाचे गाणे गाऊया !!!
~ प्रतीक्षा जया प्रभाकर
“संविधान में हमारे सपनों का भारत बसता है।“-यह वाक्य मेरा नहीं है। भारत को समता, स्वातंत्र्यता, न्याय तथा बंधुता के आधार पर निर्माण करने की नींव रखने वाले, भारत का आईन बनाने वाले, भारत को आधुनिक बनाने वाले, आधुनिक भारत के महानतम शख्सियत बाबासाहब भिमराम रामजी आंबेडकर जी का वाक्य था, जो कि पूरी जिंदगी भर उनके जीवन के उद्देश्य से जुडा हुआ था। महात्मा गांधी कहते –“मेरे सपनों का भारत तो गांव में बसता था।“ हालांकि इन दोनों के सपने भारत के प्रत्येक व्यक्ति के साथ खड़े रहने की बात करते थे। पर आधुनिकता के इस रेलचेल में बाबासाहब का सपना सच्चे मायने में व्यक्ति की प्रतिष्ठा न्याय देता है। उनका सपना सिर्फ भारत को आधुनिक बनाना नहीं था, बल्की उसके साथ –साथ भारत के हर एक व्यक्ति को शिक्षित बनाना था।
इसी से जुडा उनका एक वाक्य भी हम सुनते ही आये है, -“शिक्षित बनो, संघटित बनो और संघर्ष करो”। यह बात हर एक व्यक्ति को साधारण से असाधारण बनाने का मापदंड है। राष्ट्र का विकास उनके नागरिकों के शिक्षा पर निर्भर होता है। वे ऐसे राष्ट्र का निर्माण चाहते थे, जो सामाजिक-आर्थिक-राजनीतिक समानता तथा न्याय को सुनिश्चित करनेवाला हो। फिर सवाल आता है; क्या हम उनके और हमारे राष्ट्रनिर्माताओं के सपनो का राष्ट्र बनाने में कामयाब हो गये है या नहीं ? सवाल से जुड़े दो जवाब मुख्यतः: अपेक्षित होते है। अगर जवाब “हाँ” है तो आज गरिबी,बेरोजगारी,न्यूनतम शिक्षा का स्तर, बेजान खेत-खलियान, रास्ते-बिजली आदि से लेकर जिंदगी जीने वाली मूलभूत दवाइयों से हर आदमी मोहताज क्यों है? ऐसे कई सारे सवाल उभरकर आते है। मात्र जवाब “ना” के पक्ष में हो तो उसके कारण हमें भारत के नागरिक होने के वास्ते टटोलना जरूरी समझना चाहिए। हम भारत को कैसा बनाना चाहते है ? इस बात को समझने के लिए हमारी उतनी समझ, शिक्षा, सामाजिक मूल्य, इस पर सब कुछ निर्भर होता है।
भारत को समता, स्वातंत्र्यता, न्याय तथा बंधुता के आधार पर नये राष्ट्र बनाते वक्त “राष्ट्रवाद” की भावना की जरुरत होती है। हालाकि हमारे देश में वर्तमान में राष्ट्रवाद के दो अर्थ पाये जाते है। एक ब्राह्मणवादी संघचलित विचारधारा से प्रभावित उग्र हिंदू राष्ट्रवाद, जो जाति-प्रथा अग्रणि रखकर राष्ट्र निर्माण की बात करता है। और दुसरी १९०० वी सदी में शुरु हुई, जो लोकतंत्र, समता-समानता, स्वातंत्र्यता, न्याय तथा बंधुता की नींव रखकर भयमुक्त, कल्याणकारी राष्ट्र निर्माण की बात पर जोर देता है। जोतिबा फ़ुले, पेरियार, नारायण गुरू, शाहु महाराज, भाऊराव पाटिल, आंबेडकर आदी ने इस विचारधारा को सिंचा है। भारत को आझादी मिल के 73 साल हो चुके है। इसके बाद भी अगर हम हमारे देश को बेहतर बनाने के कामयाब नहीं है,तो हमें जरूर मंथन करना चाहिए। विशेषता हमारे युवाओं ने !
माना जाता है, कि विश्व में सबसे ज्यादा हमारे ही देश में युवाओं की आबादी पायी जाती हैं। तो फिर सवाल बनाता है, हमारे युवा आखिर क्या कर रहे है? क्या उन्हें उनके कर्तव्य का अहसास मिला है? क्या उन्हें कहाँ गुमराह किया जा रहा है? क्या उन्हें मिलने वाली शिक्षा किसी धुंधले वर्तमान में लेकर जा है। मैं इनके जवाब नहीं देना चाहता हूँ। मैं चाहता हूँ कि, वे विचार करें और अपने अंतर्मन को प्रामाणिक सवाल करें, उस कर्तव्य को सोचे जो राष्ट्र हित में अपना योगदान दे सके। हमें आज भी भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, इनकी कुर्बानी युवा की असिम शक्ति कि याद दिलाती है।
मुझे अपनी युवाओं की वायु सी बहनेवाली शक्ति पर थोड़ा संदेह निर्माण हुआ है। सदियों से जाती-वर्ग गुलामी ने भारत को एक संघ बनने नहीं दिया। शिक्षा नीति लगातार धार्मिक लिहाजों में लिपटा हुवा अभ्यासक्रम हमें पढा रही है। हमने वाशिंगटन कार्वर को पढा नहीं, क्योंकि वे कहते है- “ always remember ! Never be satisfied, start where you are, use that you have, and make something of it different” शिक्षा के संदर्भ में यह बात उतनी ही सटीक लगती है। 70 % युवाओं को गुमराह किया जा चुका है। हाल ही में आई डॉक्यूमेंटरी “द सोशल डिलेमा” इसी बात का संकेत देती है। जिस युवावस्था में भारत को बनाने का अधूरा सपना पूरा करने की जिम्मेवारी है, उसी समय हम किसी के “यूजर” बन चुके है। इसी बात को अधिक स्पष्ट करने वाले ‘नवीन रांगियाल’ अपने एक लेख का शीर्षक ही कुछ इस तरह देते है,-“मोबाइल पर आने वाला हर “नोटिफिकेशन” आपके दिमाग को गुलाम बनाने की एक साजिश है।
“नई शिक्षा नीति २०२० तो हमारे “स्किल बेस एज्युकेशन” देने की बात करती है। १२ वी के बाद जॉब ऑफर करने वाली कई सारी कंपनिया हमें जॉब देंगी। इनकम आते ही हमारी शिक्षा की रुचि कम होगी। ना हम आगे पढ़ पाएंगे। आपको पता होगा पदवी तक के शिक्षण का कोई मोल नहीं है। जो हमें उसी इतिहास को, उसी भूगोल को, उसी गणित को दोहराते ही रहती है। हमें सही शिक्षा पदव्युत्तर शिक्षा के बाद आती है। पर हमारे युवा पदवी के बाद यानी १५वी के बाद जाने में रुचि ही नहीं रखते। आगे चलकर यही पदव्युत्तर शिक्षा नीतियां बनाने में मददगार होती है। हम हमारी पॉलिसी भी बना नहीं सकते है, इतना दुर्भाग्य ! इसका मतलब साफ है। हम गुलाम बनने के कुछ ही दूरी पर है। फिर गुलाम युवा कैसा भारत बनाएगी?
एक तरफ धर्म की गुलामी, एक तरफ इस सभी सोशल मीडिया की गुलामी, एक तरफ खोंखली शिक्षा नीति, और पुछे गरिबी-बेरोजगार की खाई दिखाई देती है। इसलिए उम्मीद कम दिखाई देती है। पर ऊपर दिया हुआ कार्वर का वाक्य आप पढ़े होंगे तो आपको एक ऊर्जा जरूर मिल सकती है। वे कहते है –“start where you are, use that you have, and make something of it different” but Never be satisfied !!” मैं चाहता हूँ कि,अगर हम बाबासाहब और हमारे अन्य राष्ट्रनिर्मातों के सपनो का भारत बनाना चाहते हो। तो शिक्षा को हथियार बनाओ ! उच्च शिक्षा ही एकमात्र बदलाव का जरिया बन सकती है। आप अपना समय खोखले आदर्शवाद पर ना गवाते हुए उच्चशिक्षा को हासिल करेंगे। तब आप के साथ नई सोच, क्षमता, तर्क-वितर्क, रचनात्मकता, निर्णयक्षमता जो “ऐसा भारत बनाने में कारगर साबित होगी। हमारे दूसरे राष्ट्रवाद की व्याख्या करने वाले फुले से लेकर आंबेडकर तक के सभी राष्ट्रनिर्मातायों ने समाज परिवर्तन में शिक्षा का अहम योगदान माना है।
~ अमित शालिनी शंकर
9773822796/7506048959
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे उघडी करण्याकरिता एक वक्तव्य केले आणि म्हणाले, ‘तुम्ही धर्मनिरपेक्षित (SECULAR) झालात का?‘ सुरुवातीला असे ऐकून हसू आले आणि मनाला वाटलं, ‘अरे हा माणूस स्वतःला अजून सेक्युलर समजतच नाही का? आणि नसेल समजत तर ठिक आहे. पण मग हा ह्या पदावर काय करत आहे. आणि नक्कीच हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल.
सन १९७६ साली इंदिरा गांधी यांनी ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द भारतीय संविधानाच्या उद्देशिके मध्ये आणला. एकंदरीत धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर देशाचा आणि राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नसेल. भारतातील सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाईल आणि यात त्यांचा धर्म अथवा जात पहिली जाणार नाही. पण तरीही आपले प्रतिनिधी हे स्वतःच्या अथवा कोणत्या ना कोणत्या धर्माचे प्रतिनिधित्व करताना पाहायला येते. यात भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष असो, अथवा शिवसेना, मनसे, एमआयएम सारखा प्रादेशिक पक्ष असो. या पक्षाचा धर्म विचारले असता आपण सहज त्यांचा धर्म बोलू आणि ते आहे.
राजकीय भुमिका स्वीकार करताना राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करून सुरुवात केली जाते आणि त्यात धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख केला जातो. राज्यपालांच्या या वक्तव्या नंतर असे वाटले की फक्त वाचना पुरते धर्मनिरपेक्ष आहे का? प्रत्यक्ष आयुष्यात धर्मनिरपेक्षतेचा अवलंब करता का? राज्यपालाच्या भूमिकेत असताना तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष समजता का? कोरोना सारखा संसर्गजन्य आजार संपूर्ण जगभरात असता अनेक निर्बंध जनसामान्यांवर लादले गेले. म्हणूनच दुकाने, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मशीद बंद ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वैयक्तिक धर्मा वरून राज्याचे निर्णय घ्यावे का? त्यांनी राज्य पहावे की प्रथम धर्म पहावा? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्युलर होणे चुकीचे समजता का?
आम्ही हिंदू मुस्लिम भेद करत नाही, किंवा आम्ही हिंदू मुस्लिम असून एकत्र राहतो. म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष आहोत असे नाही.माझ्या मते घटनेनुसार सर्व धर्मांना, देश आणि राज्य समान नजरेने बघणार आणि सर्व धर्मियांना समान कायदा असणार.आणि तोच कायदा चालवताना पदावरील व्यक्तीचा कोणताही धर्म नसणार. त्याचे निर्णय धर्माच्या आधारावर नसणार. प्रत्येकाला त्याच्या धर्मावरून नाही तर प्रथम नागरिक म्हणून बघितले जाणार.
तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करता मग तुम्ही मंदिरे का उघडत नाही. तुम्ही ‘सेक्युलर’ झालात का? – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हे वाक्य एक मुख्यमंत्र्याला विचारणे सरस चुकीचे आहे. आणि धर्माच्या आधारावर राज्य चालवण्यास सांगणे ही चुकीचे आहे. आणि याचा परिणाम लोकशाही वर ही होऊ शकतो. कारण जे धर्मनिरपेक्ष समजू शकले नाही ते लोकशाही काय समजतील, ते संविधान काय समजतील!
~ पूजा रुक्मिणी जालिंदर
खरचं इज्जत, अब्रू ही योनीशी जोडली आहे का ?
नाही आणि कधीच नसेल, इज्जत हा शब्द लोकांनीच आपल्या शरीराला दिलेला आहे. विशेष करूण महिलांना देणगी म्हणून जन्मल्यापासून मिळाला आहे. असंच म्हणावं लागेल ! वयात आल्यानंतर खरा संघर्ष सुरू होतो. इज्जत हा शब्द तेव्हा आपल्या मनाशी, शरीराशी, एखाद्या फेविकॉल सारखा चिटकवला जातो. खेळण्यापासून ते अगदी झोपण्यापर्यंत सगळयावर बंधन लादली जातात. तुला कळत का? मोठी झालीस तरी मुलांमध्ये उड्या मारतेयस, अग लोक काय म्हणतील? तू मुलगी आहेस तुला घराच्या बाहेर गेलंच नाही पाहिजे, पोरीची जात तू, तू अस काही वागू नकोस ज्यामुळे तुझ्या बापाच नाव खराब होईल, मला आज पर्यंत नाही कळलं पोरगी चुकीचं वागल्याने पोरीचं नाव खराब होत की बापाचं? तिने लग्न करून जाईपर्यंत आपली इज्जत सांभाळावी, त्यासाठी ती इज्जत घरातच लपवून ठेवायची . मग तिची इज्जत घरात नाही का जात?
जेव्हा एखादा बाप, एखादा भाऊ, काका, मामा, अमका – तमका तिचं तारुण्याने खुललेलं शरीर बघून विकृत होतो, तिला एखाद्या भुकेल्या कुत्र्या सारख बघून तिची लक्तर तोडतो, तेव्हा तिची इज्जत कुठे निघुन जाते ? जेव्हा तिचा जन्म होतो आणि तिच्यावर संघर्षाचे खापर पडते आणि तिच्या खडतर जीवनाला सुरुवात होते तेव्हाच ती आतून अर्धी मेलेली असते. एखाद्या स्त्रीची इज्जत जर तिच्या योनीत असती तर आज त्या सगळ्याच बाया बेअब्रू झाल्या असत्या ज्या इच्छा नसताना पोटासाठी आपल्या देहाची किंमत मोजत आहेत. म्हणजे तुम्ही सहखुषीने जेव्हा मर्जी असेल तेव्हा दुसऱ्या बाई सोबत झोपलात की ते शरीरसुख. मग ते अमानुषपणे होत असेल तरीही तिने उफ्फ.. पण नाही करायचं आणि तेच भर रस्त्यात तिच्या देहाच्या चिंधड्या करून तिच्या मनाचा देहाचा बलात्कार झाला तर ती बेईज्जत झाली आणि तिच्यासोबत घराची ही इज्जत निघते.
वाह! रे वाह ! कधी बदलणार ही मानसिकता ? ज्या दिवशी इज्जत हा शब्द लोकांच्या विचारातून आणि कृतीतून निघेल तेव्हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. आणि तेव्हा अभिमानाने आम्ही म्हणू शकतो “आम्ही आहोत बंधमुक्त स्वतंत्र स्त्रीया”.
~ Adv.Anuradha Bhagwan Narkar
मी मयुरी, गेल्या २१ वर्षात मी स्वतः ला व इतरांना मी हिंदू धर्माची आहे, असं कधी अभिमानाने सांगावं असं कधी वाटलंच नाही. कारण “धर्म” हा शब्द ऐकताच माझ्या समोर विषमतेचे, अन्यायाचे आणि वर्चस्वाचे दृश्य येते. मुळात म्हणजे धर्म हा फक्त लोकांनी आपल्या सोई साठी व ठराविक सत्तेसाठी रुजू केला आहे . आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात धर्म हा प्रत्येक ठिकाणी भूमिका निभावताना दिसतो, ज्याचा प्रत्येकाच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो . मग तो काहींना चांगला वाटतो तर काहींना वाईट वाटतो. माझ्या ११ वी व १२ वी च्या शैक्षणिक वर्षात माझी काही मुलींशी मैत्री झाली व काही कालावधी नंतर आम्ही जिवलग मैत्रिणी झालो .
एक दिवस सहज एका नातेवाईकाने घरच्यांसमोर मला प्रश्न केला, “मयुरी तुझ्या मैत्रिणी कोण आहेत गं” ? त्या बद्दल मी उत्तर दिलं, “आपल्या शेजारच्या बौद्धवाडीतील आहेत माझ्या काही खास मैत्रिणी”. त्यावर नातेवाईकांची प्रतिक्रिया अशी होती कि, ठीक आहे पण एक कायमच लक्षात ठेव ,”त्या तुझ्या मैत्रिणी आहेत खर पण त्यांच्या घरातलं काहीच खाऊ नको! आपल्या जातीत बौद्धांचं व मुसलमानांचं काही खाल्लं जात नाही” पहिले तर आम्ही त्यांच्या घरी जाण्यास नको वाटायचं म्हणून जरा नियमात. मी पुन्हा त्यांना प्रतिप्रश्न केला, कि का असं? ती तर आपल्या सारखीच माणसं आहेत आणि त्याच्या मागचं कोणतं ठराविक कारण माहित असेल तर सांगा मला? त्यावर त्यांचं उत्तर असं होत कि “ते काही माहित नाही आम्हाला! पण आपल्या जातीत व आपल्या पूर्वजांनी सांगितले म्हणून ते नियम पाळायचे बाकी काही नाही”. या कटू अनुभवावरून मला असे जाणवले कि, लोकांना जात- धर्म याबाबत मुळात वैज्ञानिक सत्य माहीतच नसते. फक्त नियमांचे पालन नाही केले तर त्याने पाप घडेल या दृष्टिकोणाने अंध – विश्वास ठेवला जातो, ज्याने त्यांच्या स्वातंत्र्य साठी अढथळा निर्माण करतो व गुलामगिरीला प्रोत्साहन देते.
दुसरा अनुभव ज्याने मला धर्म किती आणि कश्या पद्धतीने आपण कळत व नकळत पाळतो याची लागलेली ठेच! ती म्हणजे; १३ वी ला शैक्षणिक वर्गात असताना चा हा छोटासा प्रसंग. माझ्या दोन मैत्रिणी जिवलग तसेच मुस्लिम धर्माच्या. आम्ही रोज वर्गात सर्व काही एकत्र करायचो अभ्यास ,बाहेर फिरणं , दुपारचं जेवण आणि एकमेकांना आपला डब्बा शेअर करण्याची एक वेगळीच मज्जा. मात्र एक दिवस माझ्या जिवलग मुस्लिम मैत्रिणींनी त्यांच्या डब्यात बैलाचं मटण आणलेले. आज जेवणाची वेळ झाली, आम्ही एकत्र बसलो खरं ! पण काही वेळाने माझी जिवलग मैत्रीण बोलली “मयुरी तुम्ही आज आमच्या सोबत नका जेऊ”. मी थोडे विचारात पडले हे काय नवीन आता? त्यावर ती म्हणाली , “अगं असंच नाही सांगू शकत तुला “. मी म्हंटल “असं थोडीना असत रोज एकत्र जेवण करतो , मग आज असं कोणतं कारण कि तुम्ही दोघी वेगळीकडे जेवत आहात”. तेव्हा तिने कोड्यात मला सांगितलं, अगं “आज आम्ही डब्या मध्ये जे आणलेलं आहे ना ते तुम्ही लोक नाही खात “. मला समजत नव्हते. मी तिला जरा चिडूनच बोलले , “हे काय नवीन तुझं, ‘तुम्ही लोक म्हणझे ‘ मी तर मयुरी आहे ना, तुझी मैत्रीण! ती त्यावर म्हणाली “अगं तस काही नाही, मला असं म्हणायचं आहे कि, ”आमच्या धर्मात आम्ही खातो ते तुम्ही नाही खात”. मी शेवटचं विचारते ,सांग नक्की काय आहे तुझ्या जेवणात आज? त्यावर तिने नाईलाजाने सांगितले “मोठ्याच मटण ” म्हणजे बैलाचं . …….. ……. ५ मिनिट मी शांतच राहिले … मला काहीच प्रतिक्रिया तिला देता नाही आली . तसेच दबक्या आवाजात तिला बोलले , ook , बरं जा जेवण कर तू . आणि तिथून निघून आले .
अनेक विचार येऊ लागले, बैलाचे मटण खाणे चुकीचे असते, पाप असत, आपल्या धर्मात असंच सांगितलं जात . थोड्या वेळा साठी न जाणे का पण अपराधी वाटू लागलं . मी वेळ घेतला . खूप विचार केला . कारण अश्या व्यक्तींच्या सानिध्यात मी असेन अशी कधी कल्पनाही केली नव्हती . मी स्वतः लाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली . मयुरी , तू नक्की ज्या धर्माचा विचार करतेस ते काय आणि कश्यासाठी आहे कोणी बनवलं हे तरी माहित आहे का तुला ? जसे मुस्लिम धर्मात डुक्कर ला देव मानून डुक्कर खाल्ले जात नाही. तसेच हिंदू धर्मात हि बैलाला देव मानलं जात व खात नाही . पण या साठी एकमेकांच्या धर्माला वाईट दर्शवून व त्याचा द्वेष करून आपण माणुसकी विसरायची का ? तुमची मैत्री हि कोणत्या धर्माच्या आधारावर नाही झाली. ती तर प्रेम, आपुलकी , जिव्हाळा या मूल्यांच्या आधारावर झाली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला तिला हवं तस जगण्याचा संपूर्ण स्वतंत्र आहे, आणि कोणत्या नियमांच्या आधारावर कोणाच स्वतंत्र हिरावून घेणं चुकीचं आहे असा संवाद स्वतःशी चालू होता.
नंतर मी स्वतःलाच म्हणाले ” चल उठ निराश होऊ नकोस , ह्या प्रसंगाने तुला जी मनाला ठेच लागली त्याने तुला इतकं तरी समजले ना कि भले हि तू धर्म मानत नाहीस मात्र अप्रत्यक्ष रित्या कुठे तरी धर्माचे नियम हे मनात बिंबवल्याची जाणीव झाली. आणि तुला यातून शिकायला मिळाले. धर्माच्या नियमांच्या आधारावर तुमची मैत्री झाली असती तर कदाचित तुम्ही चांगल्या मैत्रिणी कधीच होऊ शकला नसतात . एकमेकांच्या मनात भीती , किंवा अथवा अविश्वास असता . मात्र हि मैत्री माणुसकीच्या. प्रेमाच्या व जिव्हाळ्याच्या आधारावर झाल्याने ती एक पवित्र , नि: स्वार्थी व समतेच्या मार्गावर चालणारी होऊ शकली.
मी तसेच उठले, स्मित हास्य चेहऱ्यावर आणलं आणि माझ्या मुस्लिम मैत्रिणीला मिठी मारून सहजच आभार मानले . कदाचित असा अनुभव मला नसता आला तर माझ्या मनात दडलेलं व बिंबवलेले धर्म बाबतचे नियम व अटींची जाणीव झाली नसती व आंधळेपणाने दुसऱ्या धर्मा बद्दल द्वेष अप्रत्यक्ष राहिला असता.
आपल्या देशात अनेक धर्म आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख , जैन, बौद्ध ,पारसी आणि प्रत्येक धर्माचे काही नियम व अटी विचारधारा असते. ज्याने समाजात अनेक दंगली , द्वेष व वादविवाद हा चालू असतो. आमचा धर्म श्रेष्ठ तुमचा तुच्छ ! या मुद्द्याला घेऊन होत असतो . मात्र मला समजलेला धर्म या पेक्षा वेगळा आहे . “धर्म म्हणजे अशी विचारधारा जी सर्वाना आपले विचार , अभिव्यक्ती स्वातंत्र , एकता , बंधुता , प्रेम, जिव्हाळा या मूल्यांच्या आधारावर एक असा समाज बनवेल जिथे द्वेष नाही आपुलकी असेल, जिथे तुझं माझं असं नाही तर आपण अशी भावना असेल, जिथे भीती नाही तर मोकळा श्वास असेल, जिथे स्वार्थ नाही तर माणुसकी व ममता असेल”. असा धर्म आपण सर्वानी स्थापन करू या तो म्हणजे मानवता धर्म. अश्या प्रकारे धर्माचा कळत व नकळत हा प्रभाव कुटुंब, शेजारी, समाज, मित्र – मैत्रिणी , ठराविक संस्था यांच्या तर्फे पडत असतो . खरंतर यात कोणाची चुकी नसते मात्र अश्या धर्माच समर्थन व स्थापन करावे ज्यात आपल्याला नियम व अटी नाही तर स्वातंत्र ,समता , बंधुता च्या मार्गाने माणुसकीचा मार्ग सापडेल . मला धर्म समजून घेताना … “धर्म हे आपल्या मानसिकतेत व विचारधारेत असतो हे समजले. कारण आपले विचार जर मानवतावादी असतील तर मानवता धर्म निर्माण होण्यास वेळ लागणार नाही” .
मयूरी लाड
कशी आहेस तू? माहित आहे मला तू रागावली असणार, तुझ्या जन्माचं सार्थक होणं गरजेचं आहे, पण तें इथे भारतात कुठे शक्य होतंय.
मला आठवतंय तुझा जन्म २६ नोव्हेंबर १९४९ रोजी, २ वर्ष ११ महिने १८ दिवस नंतर झाला. यासाठी भारतातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव , आणि इतर काही कळकळीचे नेते यांच्या अथक प्रयत्नातून तुझा जन्म आमच्या सर्वांच्या भल्या साठी झाला. तुझ्यामुळेच वंचितांना न्याय , हक्क , समता , बंधुता , एकता एक अमूल्य मंत्र मिळाला. ज्यामुळे एक मानवधर्म निर्माण होऊन जात, वर्ग ,वर्ण ,धर्म,भाषा या कोणत्याही आधारावर भेदभाव न होता समानता स्थापित होईल अशी आशेची किरण या अंधार असलेल्या देशात आली.
आज मला तुझ्या सोबत या पत्राद्वारे व्यक्त व्हायचंय. “संविधान म्हणजे आमचा श्वास आणि प्राण तुच आमच्या जगण्याचं किरण”! पण काय करणार ज्यांना तू समजलीस त्याने तुझा आदर केला, तुझ्यावर प्रेम केलं ! पण ज्यांना तू कळलीच नाहीस ते तुझ्या सारख्या अमृताचा अपमान करतात. संविधानाचा आपल्या स्वार्थासाठी वापर करताना दिसत आहेत. खुप त्रास होत असेल ना ग तुला ? कारण तुझ्या सारखं अमृत सगळ्यालाच मिळत नाही.
समाजातील काही वंचित घटक जसे; महिला , बालके , दलित वर्ग , असमाविष्ट वर्ग , अनुसूचित वर्ग यांना अलिप्त ठेवलं जातंय. असं म्हंटल्यावर तुला तर चीड येत असणार ना ! अश्या धार्मिक , जातीय , राजकीय , हुकूमशाही प्रवृत्तीचा जे तुझ्या सारख्या अमृता पासून वंचित घटकाला दूर ठेवत आहेत. खरंतर या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. तेही तुला चांगलं माहित असेल.
तुझ्या तर्फे मिळणारे स्वतंत्र, म्हणजे मोकळा श्वास ! तू आम्हाला दिला आहेस . परंतु धर्माच्या , जातीच्या , नावावर सतत अन्याय – अत्याचार नागरिकांवर होत आहेत. तूच सांगितलं आहेस ना ! सर्वाना व्यक्त होण्याची मुभा आहे, पण इथे जो नागरिक सत्याच्या मार्गाने व्यक्त होईल त्याचा आवाज दाबला जातो. कधी कधी त्या व्यक्तीला नाही- नाहीस केलं जात. परंतु ह्या सगळ्या अंधकारात एक प्रकाशाची ज्योती हि मी तुझ्या कडे शोधत येत आहे, आणि तुला सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हेच अमृत पिऊन आम्हा वंचित घटकाला संघर्ष करण्यास सामर्थ्य येईल. मग भलेही त्या अमृता पासून या धार्मिक व राजकीय शक्तीने दूर करण्याच्या प्रयत्नात जीव गेला तरी चालेल. बोलतात ना ! माणसं मेल्यावर देवाच्या घरी जातात तसंच मी तुझ्या घरी येऊन स्वतंत्र अनुभवेन.
मी आता इतकं बोलून थांबते ! पण हो जाता जाता एक वचन देऊन जाते तुझा जन्म असाच व्यर्थ नाही जाऊ देणार आम्ही! कारण सत्याचा सूर्य अजून उजाडायचा बाकी आहे. संघर्षाची लढाई अजून आम्हाला जिंकायची आहे. तू ( संविधान ) सांगितल्या प्रमाणे “मानवधर्माची” स्थापना तुझ्या मदतीने करायची आहे. आणि आम्ही ती करणार… !!
कोटी कोटी प्रणाम !
जय संविधान !
संविधान झिंदाबाद !
तुझीच मयुरी,