हुकूमशाही …….

निरंकुश व्यवस्था मांडनारी ,

हुकूमातील हुक़ूमशाही सत्ते सारखा माज़ करणारी,

निर्दोशांना गलिच्छ  राजकारणात बळी पाडणारी,

बुरसटलेल्या विचारधारेला प्रत्यक्षात उतरवणारी ,

अशी ही हुक़ूमशाही !!!

 

भंग करी….

समानतेच्या मूल्याला,

पण…

जातिय व्यवस्थेला ,

वर्ण , प्रांत भाषेला ,

यौनीक शोषणतेला प्रोत्साहन करी ,

स्त्री-पुरूष-इतर लिंगभावाची  हत्या करी,

स्वतंत्रता-बंधुता व लोकशाही चा घात करी ,

अशी ही हुक़ूमशाही !!!

 

हुक़ूमशाही च्या जोरावर संसदेत  मात करुन  बिल पास करणारे,

यांचा अजेंडा अटकेपार झेंडा लावतो विकासाच्या नावावर ,

बालमजुरी ते बालविवाह चे बीज पेरणं,

अमानुष अत्यचार करणं,

अशी ही हुक़ूमशाही !!!

 

लोकशाही लोकशाही म्हणती, तुरुंगात कोंडती ,

बलात्कार करणारे खूनी रस्त्यावर फिरती ,

निर्णय असा घेती नागरिकात फुट पाड़ती ,

रंगाच्या राजकारणात दिशाभूल करती,

मीडियावर चालतों यांचा दबदबा ,

अजुन किती हुकूमशाही वर उडती?

 

कितीही हल्ले केली तरी हा नागरिक आता शांत नाही बसणार ,

चला एकत्र येऊन क्रांतीची ज्योत पेटवू,

लोकशाहीच्या या राज्यात संविधानाचे मूल्य रुजवू,

हुकुमशाही नको आता चुप्पी तोड़ूया ,

आपणातले सारे भेद विसरूनी

माणसाचे गाणे गाऊया !!!

माणसाचे गाणे गाऊया !!!

 

~ प्रतीक्षा जया प्रभाकर

 

 

3 thoughts on “हुकूमशाही …….”

  1. Everything is very open with a really clear description of the challenges. It was truly informative. Your site is very useful. Thanks for sharing! Reina Alard Thurston

  2. I am very happy to read this. This is the kind of manual that needs to be given and not the random misinformation that is at the other blogs. Appreciate your sharing this greatest doc. Heidie Emilio Pederson

  3. Hey there. I found your website by the use of Google at the same time as searching for a similar matter, your site came up. It appears to be great. I have bookmarked it in my google bookmarks to come back then. May Ase Josy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *