स्त्री एक अस्तित्व…

           स्त्री  हा  शब्द किती लहानसा असला तरी अखंड विश्वाच रहस्य लपलयं अहो यात. आता आपण म्हणू हे कस शक्य ? जरा विचार करून पाहिले ना तर नक्कीच उलगडेल. पण पुरुषत्चाचा अहंकार बाळगणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीत्व म्हणजे एक हिन अवहेलना, असे समजून स्वतःला दडपून घेणाऱ्या स्त्री जातीला ते हे कसे हो समजणार. अहो, या सृष्टी रथाचे चक्र जिच्या असण्याने सुरू झालं, आजही सुरू आहे आणि पुढेही असणार. त्या स्त्री शक्तीचा सन्मान आज कितीतरी ज्ञान विज्ञानाच्या सहाय्याने पुढे चालले आहे. पण समाजाने मात्र धर्माच्या, अंधश्रद्धेच्या अंधारातच स्त्री अस्तिव्त ठेवलेले जाणवते.

 

पण हे का??  याचा विचार तरी आपण करतोय का??  आणि करत नसाल तर का करू नये??…. आदिशक्तीची, नवचंडीची दुर्गा म्हणून वर्षानुवर्षे पूजा करत आलेला आणि आजही या भूमीत कित्येक वर्ष प्राचीन देवी देवतांचे मंदिरे आहेत, त्यांची प्राणप्रिय श्रध्देने पूजा , रक्षा करणारा हा समाज वृंद मात्र एका स्त्रीने नवजात बालिकेला जन्म देताच तिला याच समाजाचं बोझ समजून तिच्या अस्तित्वाची जाणीव होऊ देण्याचा आतच तिला काळाच्या पडद्या आड ढकलून देतो. मी म्हणते का हे सर्व?? तेव्हा ती ही ऐक स्त्रीचं आहे म्हणून ?? अहो पण मग जीला तुम्ही आदिशक्ती म्हणून पूजतात ती दुर्गा ती नवचंडिका ही ऐक स्त्रीचं आहे…हे कस विसरतात! आणि तरीही आम्ही स्वतःला गौरवून घेतो, कशासाठी तर आम्ही स्त्रीला समान अधिकारान वागवतो अस म्हणून.

 

आजही एकविसाव्या शतकात आपल्याला आई हवी आहे, घरात आपल कुटुंब सांभाळायला, बहीण हवी राखी बांधायला,प्रेम करणारी लाड पुरविणारी आजी हवी आहे, हक्काची मैत्रीण हवी आहे,काकू,मामी,आत्या, सूनबाई हवी आणि तीच सूनबाई ने ऐका मुलीला जन्म दिला तर ती सूनबाई आणि तीच ते नवजात कोमल बाळ मात्र आपल्याला नकोस होत. कारण का? तर आपल्या या सार्थ अभिमान असणाऱ्या समाजाला वंशाला दिवा हवा असतो. जर वंशाला दिवा हवा असतो, तर मग आपण हे म्हणुच तरी कस शकतो की स्त्री पुरुष संसार रथाची दोन चाक आहे. कारण जर संसार रथाचे पूर्षत्वाचे अहंकार गाजवणार चाक जेवढ महत्वाचे आहे, तेवढेच दुसरे स्त्रीत्वाचा गर्व नसणार चाक ही महत्वाचं आहे; नाहीतर रथ चालणार तरी कसा हो! स्त्री ही नुसतीच या निसर्ग रथाच ऐक चाक नाही तर देवाने निर्माण केलेल्या या निसर्ग रथाचे वेग सुधा स्त्री जातीच्या हातात दिले आहे. कारण जेव्हा जेव्हा या धरतीवर संकट आली आहेत तेव्हा प्रत्येकवेळी आदिशक्ती ने जन्म घेतलाय. हे ऐक त्रिकालबाधित सत्य आहे.

 

दोष हा संपूर्ण मानव जातीचा नाहीच , दोष असतो मानव जातीतील काळाच्या पडद्या आड असलेल्या रुढी परंपरा च्या नावाखाली स्वतःला जखडून घेतलेल्या या समाजातील काही धर्मांध लोकांचा. आजची स्त्री खंबीर पणे लढते आज ती सर्व क्षेत्रात तीच सामर्थ्य सिद्ध करते. त्यामागे तिच्या पाठीशी असणारे असे काही लोक जे रुढी बंधनाना न मानता कुठल्याही प्रकारचा लिंगभेद न करता स्त्री व पुरुष एकसमान आहे हे सिद्ध करतात. त्यांच्यामुळेच म्हणूनच ती चार भिंती मधील गृहिणी आज बाहेर पडते. प्रत्येक क्षेत्रात मग ते कोणतेही ही असो तीच अस्तित्व दाखवते. ती सर्वांचा हिताचा विचार करते मग आपण तरी तिला का हिनवतो.  काय अधिकार आहे आपल्याला?? तिला गरज नाही आरक्षणाची , महिला दिनाची, तिला गरज अहे तर फक्त सन्मानाने जगू देण्याची ,तिच्या अस्तित्वाची जाणीव तिला असू देण्याची तुमच्या आमच्या या समाजाच्या प्रेमाची. तिला ही इतरांप्रमाणे जगण्याचा हक्क मिळू द्या. आयुष्याचा अर्थ हा तिच्या असण्यान पूर्णत्वास जातो. ती माता संसार रथाचे चक्र येणाऱ्या प्रत्येक संकटात अनेक नात्यांच्या रुपात बांधून ठेवत असते. तिच्या असण्याने आजपर्यंत पृथ्वीचे चक्र सुखरूप सुरू आहे . एवढंच काय ज्या धरतीवर आपण आपल अस्तित्व जगाला दाखवू शकतो ती धरती वसुंधरा सुद्धा स्त्रीत्वाचा रूप आहे. स्त्रीत्वाचा अपमान करून आपण या वसुंधरेला नाराज करतोय हे ध्यानात असू द्या. यावर अधिक बोलण्या सारखे म्हणजे समाजाने स्त्रीत्वाचा सन्मान करणे महत्वाचे आहेच! पण ऐका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं आदर करणे महत्वाचे आहे. कारण बऱ्याच ठिकाणी स्त्रीला जळणारी ही स्त्री च असते. अशा काही कृत्यांमळेच समाजातील क्रूर प्रवृत्ती आणखी शक्तिवान बनत असते हे मात्र आपण विसरतो. अशा कृत्यांना आळ घालण्याचा प्रयत्न करा. तिला सुखाने जगण्याचा आनंद मिळू द्या. त्या लक्ष्मीला दुर्गेच रूप धारण करण्यास प्रवृत्त नका करू. नाहीतर एकदिवस तुमचा आमचा या समाजाचा अंत निश्चित आहे.

 

–  निकिता पाटील

     विभाग – धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *