
मला कल्पना आहे कि,
मि तुझ्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाही…
कारण माझ्या जगण्याची दिशा
मी कधीच बदलून टाकलीय…
मला त्या सुंदर मुलींसारखा
आकर्षक बांधा नाही,
आणि त्यासाठी मि काळजीही घेत नाही,
मला इतरांसारख तोलुन मापुन खाता येत नाही,
आणि असणाऱ्या वजनावर लक्ष ही देता येत नाही…
मान्य आहे राजा..!
मला त्या सुंदर मुलींसारख
लाजता येत नाही,
आणि चालणाऱ्या पावलांना आवर घालुन
नाजुकपणाचा आवही आणता येत नाही…
मला इतर मुलींसारख
तुझ्या ‘हो’ ला ‘ हो ‘ मिळवता येत नाही,
माझ्या वैचारिक आणि स्वातंत्र्य बुद्धिला
मला कुंपण घालता येत नाही…
मला इतर आदर्श मुलींप्रमाणे
स्वता: वर नियंत्रण ठेवता येत नाही,
“मी फक्त तुझीच आहे आणि तुझीच राहिन ”
अशा खोट्या भ्रमात जगता येत नाही..!
खरच आहे बघ हे..!
मी इतर स्त्रियांसाखी तुझ्याबरोबर
संसारात परिपूर्ण असेल नसेन,
कारण मला चार भिंतीच्या त्या चौकटीत
घुसमट करुन जगता येत नाही..!
मला नाही जमत तुझ्या सौदर्याच्या
कल्पनेची उंची गाठता…,
कारण माझ्या सौंदर्याचे पडदे
मीच झुगारून टाकले..!
हो…. मला आवडत ….! कसही जगण…!
निर्लज्ज बनुन ताट मानेन चालण….!
मला किचन पेक्षा मोकळ जग आवडत,
मला साडी आणि पंजाबी पेक्षा,
वेगवेगळ्या पोशाखात पेहराव करण आवडत..!
मला आवडतं माझ्या विचारांना
सतत व्यक्त करण..,
मला माझ्या इच्छा दाबून न टाकता
जे वाटते त्याला कृतीत मांडण आवडत..!
मला माझ्या मर्यादांची सिमा ओलांडून
पलीकडे जावून विरोध पत्करण आवडत..,
रोज कुणीतरी मळलेल्या पाउल वाटेपेक्षा
प्रवाहाच्या विरूध्द दिशेने पोहायला आवडत..!
मला दागिण्यांच्या शृंगारापेक्षा,
विचारांनी सजायला आवडेल..,
पारंपरिक चौकटीला तोडून बाई आणि आई पेक्षा माणुस म्हणुण जगायला जास्त आवडेल..!
माहीत आहे कि, मि तुझी मैत्रीण म्हणून
तुला खुप खुप आवडेलही..,
पण आयुष्याची तुझी जोडीदार म्हणुन
तुला माझ्यावर विश्वास टाकायला
थोड जडचं जाइल..!
कारण …,
माझी सौदर्याची व्याख्या
मी ठरवली आहे जी तुला जड होइल,
तरीही खात्रीने सांगतेय,
माझ्यासोबत जगताना आनंदा पेक्षा
कदाचित तुझ्या अपेक्षांचा भंगच अधिक होइल….!
पण हरकत नाही…,
मी तुझ्या अपेक्षेत नाही बसले तरी
मला अजिबात वाईट वाटणार नाही…,
कारण तसे ही,
माझा शोध हा फक्त पुरुषाचा नसुन,
तुझ्यातल्या माणसाचा अधिक आहे..,
तुझा मुद्दा “फेमिनिस्ट” चा असेलही बरोबर
पण माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न अधिक आहे..!
त्यामुळे…,
तुझ्या सौदर्याच्या व्याखेत बसण्यासाठी
माझा आटा पिटा कधीच नसतो..,
कारण …,
मला अडवणाऱ्या अभेद्य भिंतीना तोडायचे आहे…,
मला माझ्या जिद्दीला आजमावायचे आहे…!
खरचं …..समजतोयस का तु ?
मी तर सुरवात केली,
स्त्रित्वाच्या पलीकडे जावून माणुस म्हणून जगायला…
पण तुझ काय …..?
तु कधी भेटशिल ….?
मी वाट पाहतेय,
तु कधीतरी मला माणुस म्हणुन भेटशिल…
मी एकू पहातेय,
तु माझ्या वेगळेपणाचे गोडवे जगाला सांगशील..!
मी स्वप्न पाहतेय,
तु कधीतरी माझ्याही सौदर्याला नक्कीच भिडशिल..!
~ कविता अनुराधा अनंत.
विभाग-मुंबई