सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी अगोदर वैचारिक परिवर्तन आणण अधिक महत्त्वाचे आहे. सामाजिक परिवर्तन तेव्हाचं येऊ शकते, जेव्हा समाजाच्या बहुसंख्याकांमध्ये वैचारिक क्रांती निर्माण होईल. त्याच वैचारिक क्रांतीचे रूपांतर सामजिक परिवर्तनामध्ये होते आणि परिणामी सदृढ, सक्षम आणि स्वावलंबी समाज निर्माण होतो.
सामाजिक परिवर्तनाच्या आपल्या स्मृती प्रमाणे व्याख्या आहेत. आधुनिक संसाधनाचे प्रसारण करून समाजाचे आधुनिक युगात पदार्पण होणे. तसेच संशोधन समाजाचा खचलेला भागात, आणि त्यांचं उच्चानटन. पण कधी कधी जागतिक पातळीवर प्रसारण आणि संशोधन काहीसे निष्फळ ठरतात. कारण हे सामाजीक परिवर्तनाचा मूळ नाही; तर वरचा भाग मी समजतो. समाजाला पूरक संसाधनांचा साठा मिळवून देणे कधीच सामजिक परिवर्तन होऊ शकत नाही.
ज्या वेळेस पाणी पिण्यापासून तुम्हाला वंचित केले जाते तुम्हाला तुच्छ गणले जाते. तुम्हाला जाणीव करून दिली जाते की, तुम्ही दूषित आहात आणि हे कर्मकांड नसून तर हे नैसर्गिक आहे. आणि ते एवढं प्रभावी पडत तुमच्या डोक्यावर की तुम्ही स्वतःला ग्राह्य धरतात की तुमचा जन्म तुच्छ म्हणून झालाय. तेव्हा ह्या भूललेल्या अस्तित्वाला वैचारिक आणि वास्तवाचा आरसा दाखवला जातो. तेव्हा ती व्यक्ती सामाजिक परिवर्तन स्वबळावर करते.
संसाधनांचा पुरवठा प्रभावी नसतो कधीही. जेव्हा तुम्ही विचार करता की, मी नुसतं पुस्तक नाही वाटणार तर त्यांना वाचण्यास एवढं प्रेरित करेन की, ते कुठलाही संघर्ष स्वतःचा हिमतीवर आणि पेनाच्या बळावर करू शकतात. तेव्हा हे तुमच्याकडून झालेलं सामाजिक परिवर्तन आहे. पण सामाजिक परिवर्तन करायला टोकाची इच्छाशक्ती लागते. स्वतःला प्रेरणादायी व्हावं लागतं. तुम्ही तेव्हाच समाजात बदल घडवू शकतात, जोपर्यंत तुम्ही स्वतः एकनिष्ठ प्रभावी आणि बदल करण्याचा ध्यास स्वतः मध्ये निर्माण करत नाही. तुम्ही जोपर्यंत समाजासमोर एक स्वावलंबी आणि प्रभावी चेहरा म्हणून समोर येत नाही, तो पर्यंत तुम्ही सामाजिक बदल घडवून आणू शकत नाही. पण कुठेतरी विशेष करून आपला तरुण समाजाचा कानाडोळा होतोय. जे की परिवर्तनवादी प्रत्येक महामानवांना वाटत असेल की आपण सोडलेला दोरखंड भविष्यात तरुणाईचं ताणून धरेन. पण आपण तो दोर सोडला आहे,का ताणून आहोत ? विचार करा……..
आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, जो कोणी बुद्धानंतर या देशात नाहीतर जगात जर यशस्वी सामाजिक परिवर्तन करू शकले असणार तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
मला फक्त एवढंच सिद्ध करायचं आहे की, प्रयत्न करा कुठल्यातरी माध्यमातून प्रेरणास्रोत होण्याचा, जरी तुम्ही सामाजिक परिवर्तन नाही करू शकलात तरी तुम्ही वैचारिक क्रांती किंवा बदल नक्कीच घडवून आणणार.
जर हे तुम्हाला फिल्मी किंवा बोलण्याचा डिंग्या वाटत असल्या तरी ही वास्तविकता आहे. आज तुम्हाला त्या शिखरावर जावंच लागेल जिथून तुम्ही दुसर्यांना प्रेरणादायी आणि आणि सामजिक परिवर्तनाचा दुवा बनत नाही. आपण सगळे तेवढे सक्षम आहोत.
” ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला आहे त्यांचा उद्धार करणे आपले प्रथम कर्तव्य असायला हवे “
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
– दिपक भालेराव