
आधुनिक भारतात जिथे विज्ञानाला स्वीकारून बऱ्याच नवनवीन गोष्टी घडत आहे, विकसित होत आहेत. तिथे प्रेमाला मात्र धर्माचं, जातीचं, वर्गाचं, वर्णाचं, आणि नको त्या त्या गोष्टीचं कुंपण घालून प्रेम करणाऱ्यांवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर भलं मोठ बंधन इथल्या दहा तोंडी समाजव्यवस्थेने, धर्म, रूढी, परंपरेने लादलेले आहे. बऱ्याच साथीनी यातून स्वता:ला मुक्त केलेले आहे, काही संघर्ष करत आहेत, तर काहींना अक्षरक्षा: मृत्यू पत्करावा लागलेला आहे. तरीसुद्धा मृत्युला ही न घाबरता लोकांचा प्रेमावर विश्वास आणि प्रेमाविषयीचा आदर कायम आहे. आणि आजही हेच सर्व प्रेम करणारे साथी ‘प्रेमाचा सन’ म्हणून 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेनटाईन डे’ मोठ्या उत्साहाने साजरे करतात.
14 फेब्रुवारीला ‘व्हेलेनटाईन डे’ या दिनानिमित्त आपण ‘ऐसा भारत बनाएंगे’ अनियतकालिक च्या पाचव्या अंकात प्रेम नक्की आहे काय? प्रेमाचा लोक विरोध का करतात? आणि त्यामागील राजकारण हे काय आहे? तसेच प्रेम हे निरपेक्ष लोकांमध्ये उत्साह भरून त्यांना कस जगायला शिकवते? हे समजून घेण्यासाठी तसेच समाजमना मध्ये प्रेमाविषयी जो गैरसमज पसरवीला जात आहे, त्याला खोडून प्रेमाची खरी बाजू मांडण्यासाठीचे युवकांचे विचार ‘ऐसा भारत बनाएंगे’ या पत्रिकेद्वारे पोहचविण्याची आपली जबाबदारी आपण सर्व मिळून पार पाडत आहोत.
तसा प्रेम हा विषय खूप गंभीर समजला जातो, पण या वेळेस च्या अनियतकालिक साठी मोठ्या संख्येने युवकांनी पूर्ण उत्साहाने प्रेमावर आपले चांगले – वाईट अनुभव तसेच प्रेमविषयीचे आपले मत, समाजाचे मत, प्रेमाचे राजकारण याविषयी लिहायचा प्रयत्न केला आहे. प्रेम हे आई-वडील, भाऊ-बहीण अस कोटुंबिक नात्याच्या पलीकडे घेऊन ते प्रेयसी-प्रियकराचे प्रेम , मैत्रीतल प्रेम, समलेंगीक प्रेम, अनीलिनगिय व्यक्तीच प्रेम, निसर्गावरील प्रेम असे बऱ्याच वेवेगल्या प्रेमाविषयी युवकांनी लिहिले आहे. प्रेमावर लिहीत असताना बऱ्याच साथिणी कस प्रेमाला जातीच्या धर्माच्या वरणाच्या वर्गाच्या लिंगच्या चषयातून बघून समाज त्याचा धिक्कार करतो आणि त्या प्रेमला संपण्यासाठी नाना प्रयत्न करतो याच दुख व्यक्त केल आहे.
अशी वाईट परिस्थितही समाजात प्रेमाविषयी असतांना सुद्धह प्रेम कस सुंदर आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा युवकांनी केला आहे. प्रेमात लोक आपली जात धर्म वर्ग वर्ण पुरुषी वर्चस्व गाजविणारी मानसिकता सोडून, प्रेमामध्ये माणसाला माणूस म्हणून बघन्याची नवीन संस्कृति उदयास येताना दिसत आहे. प्रेमात प्रत्येक व्यक्ति एकामेकांच स्वातंत्र्य जपत आहे, एकामेकांच आदर करत आहे. प्रेम हे सर्व प्रकारच्या विषमतेला नष्ट करण्याच कार्य करत आहे. प्रेमामुळे प्रत्येकाच्या मना मनात माणुसकी फक्त आणि फक्त माणुसकी नांदत आहे. तर अश्या ह्या समाजात क्रांतिकारी परिवर्तन आणणाऱ्या प्रेमाला, प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजाने जपल पाहिजे. प्रत्येक प्रेम करणाऱ्याचा आदर आपण सर्वानी केला पाहिजे.
संपादन – विशाल, पूजा