
तीन जानेवारीच्या दिनी,
आम्ही सावित्रीच्या लेकी एकत्र येऊ,
शिक्षणापुढे आकाश ठेंगणे,
तिचेच गाणे आम्ही लेकी साऱ्या गाऊ,
शोषितांची ढाल, आमची माऊली ती साऊ….
जरा आठवा साऊंचा इतिहास, खुप काय काय सहन कराव लागलं साऊंनां, पण त्यांनी संघर्षही तेवढाच केला . त्याकाळी मुलींना शिक्षण न्हवत फक्त मुलांनाच शिक्षण उपलब्ध होत, आणि अशा काळात साऊंनीं स्वता शिक्षण घेतल व कुठलीही मुलगी स्त्री शिक्षणाशी वंचित राहु नये म्हणून त्यांनी त्यांच्या वाड्यात मुलींना शिकवणं सुरू केल. पण त्यात ही त्यांना खुप अडचणी येऊ लागल्या. मुली शिकून काय करतील, मुलींच शिकण योग्य नाही असे काही लोक बोलू लागले. साऊंच्या अंगावर शेण, दगड फेकून विरोध करत होते, पण तरीही साऊ खचल्या नाही, उलट त्यांनी त्यातही संघर्ष केला. आजच्या युगात आपण काही करायला गेलो आणि त्यात कोणाचाही विरोध असेल तर आपल्याला जे करायच होत ते राहिल बाजूला, आणि आपण त्या लोकांशी भांडंत बसतो. पण साऊंनीं तसे केल नाही. लोक जरी विरोध करत असले, तरी त्यांनी लोकांकडे लक्ष न देता संघर्ष केला.
आपण काहीच करू शकत नाही, आपला जन्म फक्त घर आणि मुलं सांभाळण्यासाठी झाला आहे व नवऱ्याने सोडून दिल्यानंतर चुक आपलीच आहे, अस वाटणाऱ्या शोषित महिलांसाठी व मुलींसाठी सावित्रीबाई फुले या एक ढाल होत्या. साऊंनीं स्त्रियांना जाणीव करून दिली होती की, आपण पुरूषांपेक्षा कमी नाही.
आता आपण ही शिक्षण घेऊ शकतो. का? आपणच फक्त सहन करायच …? आता आपण शोषित राहायच नाही तर शहान व्हायच. अस त्यांनी स्त्रीयांना पटवून दिले. म्हणून त्यांना शोषितांची ढाल असे म्हणत. साऊंच्या या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देणारे, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे महात्मा जोतिबा फुले म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचे पती. जोतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनां साऊ अस म्हणत होते. तस तर कुठल्याही यशस्वी पुरूषाच्या मागे त्याच्या पत्नीचा हात असतो अस म्हणतात, पण हिते तर एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या पतिचा हात च नाही तर पूर्ण पतीच आहे.
म्हणूनच मला म्हणावसं वाटते की..
नका बनू माधुरी, ऐश्वर्या, करिष्मा
बना तुम्ही फक्त जिजाऊ, सावित्री, रमा…
~ प्रज्ञा राजेंद्र गायकवाड
विभाग-मुंबई