तुझ्या डोळ्यातील पाण्यामागच कारण मी आहे…
मी जाणतो…
तुझे पंख भरारी घेण्यास फडफडत आहेत पण त्यास घातलेला आळ मी आहे…
मी जाणतो…
तुझ्यात तू अनंत आहेस पण माझ्याशिवाय तुझं काहीच नाही हे भासवणारा मीच याची खंत आहे….
मी जाणतो…
तू या आभाळाचं प्रतिबिंब आहेस पण तो आभाळ मी असल्याची खोटी बोंब ठोकणारा मीच आहे…
मी जाणतो…
जागतिक महिला दिनानिमित्त…
सर्वच महिलांना समर्पित
- अजय अनिता लक्ष्मण