
मी आहे आजची स्री,
बाबांची लाडकी जराशी बोलकी।
तशी तर मी आहे भारतमाता,
पण खात आहे शब्दांच्या लाथा।
श्वास मोकळा मलाही आवडतो,
काही वेळेस तोच मनात भिती दडवतो।
नको मला भावाची जागा,
मुलगी म्हणुनी जरा माझ्याकडे बघा।
दुनियादारीत थोडीशी कच्ची आहे मी,
तरी सुध्धा आई बाबांची बच्ची आहे मी।
मोठ्यांचा ओरडा, छोट्यांची जबाबदारी,
स्वतःचे अस्तित्व शोधत आहे दारोदारी।
नको मला पैसा बंगला आणि गाडी,
हवी आहे मला मनात तुमच्या गोडी।
आवडी आहेत माझ्याही खुप,
संसाराच्या उन्हात झाल्यात कुरूप।
माहेरची जात नाही ओठ,
सासरघरची भेटत नाही जोड।
स्वप्न आहेत माझेही मोठे,
पण मुंलापुढे आहेत छोटे।
ना मी तुमच्या पूढे ना पाठी,
चालूयात सोबत आयुष्याच्या वाटी।
ऐकच आहे माझे आवाहन,
करू नका माझा अपमान,
हवा आहे मला फक्त सन्मान।
~ सतीश निकाळजे
Great, thanks for sharing this blog article. Much thanks again. Really Great. Sosanna Myles Modla
Thanks for finally writing about > मी आहे आजची स्री… – CPD: Center for Promoting
Democracy < Liked it!