बलात्कार पीडिता बद्दलची ‘समजवृत्ती’

संविधानाने भारतातील सर्व नागरिकाना समान हक्क अधिकार दिले आहेत.मग ती स्त्री असो वा पुरुष.संविधान अस्तित्वात येउन आज 72 वर्षे पूर्ण झाली. तरी आजही महिला सुरक्षित नाहीत का? याला जबाबदार कोण ?…याला जबाबदार असणारी आपली समाजव्यवस्था आणि आपली मानसिकता आहे ती बदलणे खूप गरजेचं आहे. संविधानाचे रक्षण व सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्ये आहे.पण आजही काही व्यक्ति संविधान हटविण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा कवच प्रदान केले आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तिचा दर्जा वाढतो. संविधानामुळे देश एकसंघ आहे.काही विषमतावादी लोक संविधान बदनाम करून त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

       माहिलाना जीवन जगताना समाजव्यवस्थे मुळे येणाऱ्या अडचणी वर मात करण्याचा मार्ग संविधानाने दिला आहे.तरी महिलाना त्या बलात्काराच्या आगीतून सामोर जावं लागत. आजही महिला सुरक्षित नाहीत. बलात्कार, अत्याचार, विनयभंग असे अनेक गुन्हे होत आहेत.गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रत्येक ठिकाणी महिलांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतो त्याना कमी लेखल जात चुल अणि मूल यातून बाहेर स्त्रीने दिल्लीच्या तख्ता पासून चंद्रावर जान्या पर्यंत चा प्रवास यशस्वी रित्या पूर्ण केला आहे,तरीही स्त्रियाना दुयम स्थान अजुन ही मिळत आहे.बाल विवाह,वैश्या व्यवसाय,शिक्षणा पासून वंचित ठेवणे असे कित्येक अन्याय महिलाना सहन करावे लागतात. 

संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समान न्याय,अधिकार,कायदे कानून दिले असतानाही महिला सुरक्षित का नाही ? का त्याचा छळ केला जातो? प्रत्येक महिला ही बलात्कारातून जात असते मग तो बलात्कार शारीरिक असो, मानसिक असो, वैचारिक असो, शाब्दिक असो, तिला तो सहन करावा लागतोच.बलात्कार, अपहरण, विनयभंग, अत्याचार खूप वाढत आहेत.  अगदी 3 वर्षाच्या मुलापासून ते 60,70 वर्षीय महिले पर्यंत बलात्कार होत आहेत.बलात्कार सहन करताना काय वेदना होतात, काय त्रास होतो, कसे  समाजाला तोंड द्यावे लागते. त्यात त्या महिलेचा जीव ही जाऊ शकतो. हे फक्त त्या बलात्कार होणाऱ्या महिलेला माहिती. समाजात याचा दोष ही महिलेला दिला जातो की ती घरातून बाहेर का जाते,ति साड़ी मध्ये नव्हती,तिने केस मोकळे  सोडले होते,लिपस्टिक लावून नटून थटून निघायची… अशी भाषा त्या पीडित महिलांच्या विरुद्ध वापरली जाते .परंतु पुरुष प्रधान देशामध्ये कधीच पुरुषावर याचा आरोप केला जात नाही.मुलीचा खेळण्या बागडण्याच्या वयात बलात्कार होतो. त्या मुलींना माहिती पण नसत बलात्कार म्हणजे काय? आपल्या सोबत काय घडतंय? 

    बलात्कार  म्हणजे काय ?  बलात्कार म्हणजे व्यक्तीच्या सहमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे. त्याचबरोबर सामूहिक बलात्कार ही होत असतात आता सामूहिक बलात्कार म्हणजे काय? तर सामूहिक बलात्कार म्हणजे जर बळजबरी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केला असेल तर त्याला सामुहिक बलात्कार म्हणतात. बलात्कार करणे कायदेशीर गुन्हा आहे अणि तो सिद्ध झाल्यास त्याची शिक्षा ही कठोर आहे. तरीही बलात्कार वाढत आहेत. भारतात बलात्कार व सामूहिक बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत.त्याला कारणीभूत कोण?

     संविधानाने फक्त महिलांसाठी वेगळे कायदे तयार केले आहेत. तरी महिलाना का असे बलात्कार सहन करावे लागतात. सहन करून पण त्यांना न्याय का मिळत नाही त्यांचा गुन्हेगार मोकाट फिरत असतो . ही आपली नायप्रणाली….? बलात्काराच्या प्रकरणासाठी वेगळ न्यायालय हवंय जेणेकरून त्या गुन्हेगाराना लवकरात लवकर न्यायालयात हजर केले जाईल व त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला तात्काळ कठोर शिक्षा सुनावली पाहिजे.आणि त्यांना अशी शिक्षा दिली पाहिजे.फक्त माहिलाना दोष देण्या पेक्षा मुलाना ही स्त्री बदल आदर करायला शिकवल पाहिजे मुलगा आणि मुलगी याना आपल्या घरातूनच समान वागणूक दिली पाहिजे,जेने करुण त्यांना अशी भावना येणार नाही की कोण श्रेष्ट आहे.बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळवून दिल्या नंतर पीडीतेला पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी तिला सर्वानी प्रोत्साहन दिले पाहिजे शिवाय इज्जत हा जो प्रश्न आहे तो तिच्या योनी मुळे  नाही ही समज प्रतेकाने घेतली पाहिजे.

  • अक्षता बोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *