
प्रेम, प्रेम म्हणजे असतं तरी काय?
कोणीतरी चोरून मनात शिरणे,
कोणालातरी चोरून सतत पाहणे,
आणि समोरच्याला चाहूल लागताच बेदम घाबरणे!
प्रेम म्हणजे असतं तरी काय?
एखाद्याशी खूप-खूप बोलावसं वाटणे,
एखाद्याचं खूप-खूप ऐकावसं वाटणे,
पण समोर आल्यावर मात्र बोबडी वळणे!
प्रेम म्हणजे असतं तरी काय?
प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीचा विचार करणे,
नेहमी एकाच व्यक्तीच्या आठवणीत रमणे,
आणि कोणत्याच कामात लक्ष न लागणे !
प्रेम म्हणजे असतं तरी काय?
जगताना मित्र म्हणून,
संसारात सोबती म्हणून,
मात्र उतारवयात आधार म्हणून हवी असलेली आपली,हक्काची व्यक्ती !
प्रेम म्हणजे असतं तरी काय ?
जुळून आलं तर स्वर्गीय सुखाचा आभास,
तुटलं तर नरकीय यातना आणि भ्रमनिरास,
जर सांभाळून घेतलं तर लोकलमधील चौथ्या सीटचा प्रवास!
प्रेम म्हणजे हवा-हवासा सहवास आणि अतूट विश्वास,
तिमिरमय आयुष्यात देणारा प्रकाश,
‘प्रेम’ ही भावना आहेच खास !
– कु. प्रणाली केशव नलावडे
विभाग – दिवा, ठाणे.
Thank you CPD