प्रेमात पडल्यावर….!

प्रेमात पडल्यावर काही कळत नाही…… 

सगळे काही कळत नकळत घडतं…. 

कधी मन गूपचुप रडत, तर कधी हळूच हसतं ….. 

समजत नाही काही, सतत् आतुरता राही… 

कोणी वेडे म्हणते तर कोणी पागल…. 

पण हे सर्व चांगलच वाटत प्रेमात पडल्यावर… 

टोकत असतात सर्व जण… 

आणि चेष्टा करतात मित्रगण…. 

तसं बोलण्यातून तर प्रेमळ वाणी… 

रात्रंदिवस फ़क्त सायलेंट गाणी…. 

स्वप्नात ही प्यार वाली कहाणी… 

खुप समजुतदारपणा येतो वागण्यात… 

सगळं कसं गोड गोड भासत…. 

आणि दुराव्यात मन खुप रुसतं … 

अशा क्षणी काय कराव हेच सूचत नाही…. 

एक तर कोणा पासुन लपवता येत नाही…. 

चेहऱ्यावर नेहमी प्रफुल्लित भाव असतो….. 

कधी जोरात तर कधी विनाकारण हसतो… 

प्रेमाला नका होऊ देऊ बदनाम… 

त्याला नका समजू ‘वस्तू’…. 

प्रेम ही जाणीव आहे.. ती एक कसरत आहे… 

ह्या कसरतीची करून घ्या सवय… 

आणि प्रेमामध्ये जगावं लागतं, बिनशर्यत रहावं लागतं…. 

– किरण कांबळे

विभाग – नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *