प्रिय “ती”…
” ती ” संस्काराच्या दलदलीमध्ये वर्षानुवर्षे टाकलेली.
” ती ” समाजाच्या असमान बंधनांमध्ये जन्मापासून अडकलेली.
” ती ” जि चुल सांभाळता सांभाळता मुलं सांभाळते.
” ती ” जिच्या डोक्यावरच्या सिंधुरापासून ते पायाच्या पैंजनापर्यंत संस्कृतीच्या नावाखाली गुलामीच्या बेड्या घातलेली .
पण तिच्याबद्दल बोलणारा “मी” कोण ?
“मी” तिच्याच योनीतून येणाऱ्या रक्ताचा एक विद्रोही कण! ज्याच्या येताच तुम्ही तिला वाळीत टाकता आणि समजता घाण, पण खर सांगु तिच्या मुळेच तुम्हा जन्म-प्राण.
तिला माझं सांगणं आहे, ते तुला कमजोर समजतात पण खरं सांगु तु लढवय्यी आहेस. वर्षानुवर्षे भोगत आलेल्या समाजाशी रोज लढतेस.
आज मी तुला घ्यायला आलोय,
चल ना चल ओलांड त्या धर्माच्या, त्या दबावात ठेवणाऱ्या समजाच्या चार चौकटी.
गुलामीला धिक्कारत, असमानतेच्या साखळदंडा तोडत..
दाखव डोळे मनुच्या स्मृतीला, लाथ मार स्त्री- दास्य रुढी परंपरेला आणि निघ!
क्रांतीची दे चाहुल स्त्री-मुक्तीच उचल पाऊल, आपण निघुन जाऊ दुर आकाशी एका विद्रोही स्वातंत्र्याचे पक्षी बनत,
त्यांच्या अंधाराच्या जुलमी वाटेपासून ते तुझ्या उजेडाच्या संघर्षाला समर्पित..
आणि पुन्हा प्रश्न तोच “मी” मी कोण ?
“मी” माणूस (मी तुझा सोबती )
– बुद्धराज बावस्कर