
पाणी हे आपल्या रोज मरणाच्या जीवनात अत्यंत गरजेचे असते. पाण्याचे रंग बदलतात हे वाचून आपणांस आर्श्चय वाटले असेल ना ? हो पाण्याचे रंग बदलतात!
पाणी किती महत्वाचे आहे, हे आपल्याला संतांनी, महामानवांनी पाण्याचे महत्व सांगितले आहे. संत कबीर, संत रहीम , तुकाराम महाराज यांनी पाणी प्रत्येकाला मिळाले पाहिजे असे सांगितलं आहे. संत गाडगे महाराजांनी तहानलेल्या पाणी द्या! असे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला पाणी पुरेसे मिळावे म्हणून; डोंगर तिथे किल्ला व त्या किल्यावर पाण्याचे तलाव व त्या तलावाचे पाणी सर्व सामान्य रयतेला मिळावं या धोरणाची अंमलबजावणी केली. महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या घराचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याच राज्यातील गुलाम म्हणून कैद असलेल्या लोकांना एकत्र करून कोल्हापूर शहराची तहान भागवण्यासाठी राधानगरी धरण बांधलं. आणि आपणास माहित आहे; डॉ. बाबासाहेब यांनी महाड चवदार तलावात जाऊन स्वतः अस्पृश्यांना चवदार तळ्याचे दार खुले करून दिले. फक्त खुलं करून दिल नाही तर भारतीय संविधानात पाणी हे मूलभूत अधिकाराची मांडणी केली व पाणी हे प्रत्येक सजीवाला मिळाले पाहिजे असा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. हे आपण सर्वांनी वाचलं असेल किंवा ऐकलं तरी असेलचं.
या स्वप्नांच्या नगरीत, मुंबईत महानगरपालिका सर्व सामान्य श्रमिक नागरिकांना वेगवेगळे रंग दाखवते. आंबेडकर नगर, मालाड (पूर्व) ठिकाणी २१ व्या शतकात कोणतीही शुद्धीकरण न करता मला पिण्यासाठी विहिरीचं पाणी घ्यावं लागते. हे पाणी आठवड्यातून 3 दिवसानंतर दिल जात. आणि हे पाणी कधी रात्री २ वाजता तर कधी ३ वाजता येते. याचा सर्व त्रास आईला होतो. याचं वस्तीत राजकीय दलालांनी पाणी चा बाजार मांडला आहे. ते सरकारी पाणी चोरून बेकायदेशीर पद्धतीने याच वस्तीला जास्तीचे पैसे घेऊन पाणी पुरवतात आणि श्रमिक लोकांकडून लूट करत आहेत. प्रत्येक कुंटुबाकडून ३०० रु. प्रति महिना लूट चालू आहे.
मालाड पश्चिम येथे अंबुजवाडी वस्तीमध्ये १९९२ पासून आता पर्यत प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांनी बँनर लावले पाणी येणार व पाण्याच्ये उदघाटन सुद्धा करण्यात आली. हे सर्व पाहून असं वाटतं कि, लोकांच्या जीवना बरोबरचं खेळ मांडून ठेवला होता. आता पर्यत ३ ते ४ वेळा पाण्याच्या लाईन टाकल्या व निवडणूक संपल्या की पुन्हा काढल्या जात होत्या. वस्तीतील लोकांचा गेल्या ११ वर्षाच्या संघर्षांनंतर आता वस्तीत पाण्याच्या वाहण्या पोहचल्या आहेत. तरी राजकीय दलालांनी इथे सुद्धा बाजार मांडलेला दिसतोय, जे पाणी कनेक्शन घेण्यासाठी ७ हजार ते १० हजार मध्ये पाणी मिळू शकते, तेच राजकीय दलाल ३५ हजार ते ५० हजार पर्यत खर्च लोकांकडून घेऊन श्रमिकांची लूटमार सुरू केली आहे. कायदेशीर रित्या पाणी घेण्यासाठी लोक महानगरपालिकेकडे धावपळ करत आहेत. पण त्याच महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या पाणी अधिकाराला नाकारून, पाणी कसे थांबवता येते या कडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहे आणि राजकीय दलालां सोबत व्यवहार करून लाच खाण्यात जास्त लक्ष देत आहेत .
अशी ही पाण्याची दलाली, बाजारीकरण संपवण्यासाठी आपण प्रत्येक नागरिकांनी आपल्या हक्का प्रती जागृत राहील पाहिजे. भारताच्या वेवेगळ्या धर्मामध्ये, संस्कृती मध्ये पाण्याचे महत्व सांगितलं आहे. पाण्याचा धर्म आणि तहाणलेल्या पाणी पाजायची आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. मुंबई महापालिकेला पाण्याच्या शुद्धता चांगली आहे म्हणून जगभरात ओळखल जाते. पण मात्र महापालिकेने चालू केलेलं पाण्याचे बाजारीकरण थांबवले पाहिजे. आणि आपण ही नागरिक म्हणून आपल्या अधिकारासाठी आणि कर्तव्यासाठी जागृत राहील पाहिजे. जिथे जिथे सरकार आपल्या हक्का आड येत असेल तिथे आपल्या हक्कासाठी सरकार विरोधात बंड पुकारून संघर्ष केला पाहिजे.
~ योगेश राजेश्री रामचंद्र बोले
विभाग – मुंबई