
पाण्याच्या प्रेमाची कल्पना करता
मनी येते स्वसमर्पणाचे उधान
हाडीमासी गुंतलेला देह
तो रक्षिण्या स्वतः च्याच चामडी चे परिधान.
पावसाचे पाणी आकाशात पिऊन, स्वतःची तहान भागवणारा पक्षी एकमेव चातक
मनुजा आपण जर असे करू लागलो
तर ते होईल जीवा जीवा घातक.
चराचराचा क्रम अव्याहत
एकापासून हा जन्म तुझा
पाण्याने जगवत आणले
पूर्वजांपासून आम्हां वंशजा.
पाण्याला लागत नाही परिचय
तहान तहान ला जिथे तिथे पाणी उत्तरे निश्चय
भागून तुमची तृष्णाई
ते पुन्हा दुजाच्या शोधात जाईल.
थेंबे थेंबे हा वाटतो
साठवताना कसला लहान
थेंबे थेंबे तळे साचे
उक्ती आहे किती महान.
माधुरी शिंदे – सोनावणे, बदलापूर