तीचं संपणार तारुण्यपण !

सर्वजण तिच्या ती असण्याचं कौतुक करतात ; काहींना तर ती म्हणजे कोण? तेच कळण्यास काही दिवस जातात.

 

अहो! तीचं  ती कधी आईच्या रूपात, कधी बायकोच्या रूपात,  कधी बहीण तर कधी मुलीच्या रूपात असते. तिची वागणूक, त्याग , सौंदर्य , माता , गर्भ धारणा , लाजरी , नाजूक , सहन शील , भावनिक यावरून तीचं स्त्रीत्व ठरवलं जात.

 

किशोरपणाच्या उंबरठ्या पासुन ते तारुण्या पर्यंत तिच्यात झालेले बदल आपल्याला दिसतात , कोणी त्याचा आदर करतो तर कोणी वासनेच्या आहारी जाऊन अत्याचार करतो.

 

लहानपणी मासिक पाळी आल्यावर आई जपते , लग्न झाल्यावर गरोदरपणाच्या वेळी परिवाराकडून जपलं जात. बरोबर ना???

 

मग पुढे काय?  फक्त मासिक पाळी , लैंगिक सुख , गर्भ धारणा पर्यंतच हा योनी व गर्भ प्रवास असतो का?

 

सविस्तर विचार करायला गेलात तर नाही!  उतारवयातही तिची तशीच काळजी का नाही घेतली जात? जशी किशोरवयात व तारुण्यपणात घेतली जाते.

 

का तर? उतारवय हे मासिक पाळी गर्भधारणेचा नसते.

बरोबर आहे! .

 

आज पर्यंत तिचा वापर आपण एक घराची इज्जत , पोरं देणारी मशीन , आणि उपभोग घ्यावयाची वस्तू  इथपर्यंतच करतो व संसाराचा गाडा ओढणारी गुलाम म्हणूनच करतो.

 

पण कधी आपण विचार करतो का? तीचं  तारुण्यपण संपल्यावर तिच्या गर्भाचं काय? योनी च काय? करतो का हा आपण विचार नाही ना???.

 

तर मग करून बघुयात! एखादा विचार, घेऊयात काळजी तिच्या गर्भाची , करूयात विचारपूस एखादा तिच्या मातृत्व सुखाची.

विचारू यात एखादा तिला अजून हि त्रास होतो का ग तुला?

 

मग बघा तिला तीचं  स्त्रीत्व असल्याचा अभिमान वाटतो कि नाही..!

 

 

~ मयुरी लाड

  विभाग-मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *