चूल, मूल आणि ती…….

एक स्त्री म्हणून जगणं सोपं नाही. स्त्रिया अत्यंत जबाबदार असतात; पण म्हणून स्त्री म्हटलं की चूल आणि मूल इतकंच काय ते तिचं आयुष्य….?

 

ती तिची सगळी कर्तव्य अगदी काटेकोर पद्धतीने बजावत असते. स्वतःच्या इच्छा आकांशा असूनही तिचं  अस काहीच नसतं. ती फक्त इतरांन करिता तिचं आयुष्य जगत जाते. हे तुझं घर नाही, लग्न करून सासरी जा, तेच तुझं खरं घर. आणि तिकडे ही परक्या घरातून आलेली स्त्री अशीच वागणूक तिला भेटतंआली. चूल आणि मूल सांभाळणं हे सोपं नाही, हे फक्त एक स्त्रीच समजु शकते. ती चूल सांभाळते, घरातल्या माणसांची काळजी घेते,  मुलांना मोठं करणं, त्यांच्यावर संस्कार घडवणं, हीच तीची एक चौकट . हे सगळं सांभाळताना ती एक नवी पिढी घडवत असते.

 

हे सगळं पूर्वी पासून चालू आहे. ज्या वेळी स्त्रियांना समाजात केवळ चूल आणि मूल ह्या चौकटीत पाहिलं जायचं; अश्या वेळी समाजात तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवीन दिशा, आस्तित्व  द्यायचं काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. महिलांच्या मुक्तिदाता म्हंटल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित   करण्यासाठी त्यांच संपुर्ण आयुष्य खर्ची घातले. सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीका. सहनशीलता जणू बाईच्या अंगी भिनलेलीच असते. 21 व्या शतकात  प्रत्येक क्षेत्रात स्त्री ने स्थान प्राप्त केले आहे. पण तरीही स्त्रीला कधी खूपच सन्मान देतात, तर कधी अगदीच वाईट वागणूक दिली जाते. थोडक्यात काय तर जगाला हवी तशी वागणूक तिला दिली जाते. आजच्या घडीला महिला घर मुल सांभाळून देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करतात. घरचं बाहेरचं दोन्ही करतात, तरी ही घरातील सगळी काम अगदी काटेकोर पध्दतीने पार पाडतात. इतकं सगळं होऊन तिच्या पदरात काय पडतं? तर फक्त दुय्यम वागणुक! आपण म्हणतो स्त्री स्वतंत्र झाली पण खरंच अस वाटतं  का तुम्हाला….?

 

अजूनही स्त्रीला का समजून घेतलं जात नाही, तिला काय वाटेल याचा विचार समाज का नाही करत. आज ही कित्येक घरांमध्ये स्त्री वर अत्याचार होतो, पुरुष मारतो, तिचा मानसिक-शारीरिक छळ होतो. अश्या घटना रोज घडतात. समाज अजूनही विचारसरणीने पूर्णपणे पुढे गेलेला नाही. समाजाचा स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही बदलला नाही. खरंच अश्या या आधुनिक युगातील समाजव्यवस्था बघून मला बाबासाहेबांचे वाक्य आठवते. बाबासाहेब सांगतात, “एखाद्या समाजाची प्रगती मी त्या समाजातील महिलांनी प्राप्त केलेल्या प्रगतीवरून मापतो.”  खरंच जर समाजव्यवस्था ने स्त्रियांविषयीचा आपला दृष्टीकोन बदलला तर स्त्रियांची प्रगती होऊन  समाजात क्रांतिकारक परिवर्तन होईल. त्यासोबत आपला देश जो विकसनशील आहे तो विकसित होईल.

 

~ आरती इंगळे  

    विभाग-मुंबई

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *