कामगार की गुलाम

१ मे ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ हा जगभरातील कामगारांच्या हक्काचा दिन विशेष आहे. प्रत्येक वर्षी या दिवशी जगभरातील अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. तसेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो. 

भारतात औद्योगिक क्रांती झाली. त्यानंतर कामगारांना रोजगार प्राप्त होऊ लागला. परंतु त्याच बरोबर कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण देखील होऊ लागले. १२ ते १६ तास त्यांना राबवून घेतले जात होते. या विरोधात सर्व कामगार एकत्र आले व कामगार संघटनेची निर्मिती त्यांनी केली. कामगाराला केवळ ८ तास काम असावे असा ठराव यात करण्यात आला. त्यानंतर कामगार संघटनांच्या हक्कासंदर्भात दोन 

आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. व १८९१ पासून १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

परंतू कामगार संघटनेची स्थापना करुन सुध्दा आज देखील कामगारांची होणारी पिळवणूक किती प्रमाणात थांबली आहे हा प्रश्न आज पडतो…..? श्रामिकांवर अन्याय व अत्याचार खरच थांबला आहे का. आज देखील अनेक ठिकाणी कामगार अत्याचाराच्या बळी पडले जातात. कामगारांना त्यांचे हक्क माहीत असून देखील त्यांचे शोषण होते. मुळात त्यांच्या हक्का साठी कामगार स्वतचं लढत नाही. मुकाट्यानं होणारा अन्याय सहन करून घेतात. कुटुंबाची असणारी जबाबदारी त्यांना हे करायला कुठे तरी भाग पाडत असते. सध्याच्या काळात रोजगार तर प्राप्त आहे. परंतू त्या मोबदल्यात मिळणारं वेतन आणि होणारी मानसिक आणि शारीरिक पिळवणूक ही कामगारांची खरी मोठी समस्या आहे. कामगारांचा बुलंद आवाज आज कुठेतरी हरवत जातो.

आज पूर्ण देश कोरोना सारख्या महामारीच्या विळख्यात सापडला आहे. अश्या वेळी हातावर पोट असलेल्या कामगारांचे खूप हाल झालेत. अगदी अन्न मागुन खायची वेळ या कामगारांवर आली. अनेक ठिकाणी कामगार काम मिळेल या आशेने नाक्यांवर उभे राहतात. परंतू त्यांना काम मिळत नाहीं. आणि जरी काम मिळाले तरी त्या बदल्यात योग्य वेतन कामगारांना दिल जात नाही. या नाका कामगारांची कंत्राटदारांकडून फसवणूक  प्रकर्षाने समोर येते. बहुतेक नाका कामगारांची नोंदणी होत नसल्याने त्यांना  योजनांपासून आजही वंचित राहावे लागत. सरकार अनेक नवीन योजना या कामगारांसाठी राबवत असते, परंतू तरी देखील या योजनां पासुन त्यांना कुठेतरी डावललं जातं. 

कामगारांना आज काम तर मिळत आहे. पण ते एक ठराविक कालावधीसाठी. त्यात यांचे भविष्य नसते.  कधीही त्यांना कामावरून काढून टाकले जाते. त्यामुळे अशा कामगारांवर उपासमारीची वेळ येते. आणि कर्ज काढून त्यांना जगाव लागते. नंतरच पूर्ण आयुष्य हे कर्ज फेडण्यात जात.  त्यात या कामगाराला दूसरे काम मिळाले तर ठिक नाहीतर संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. घरभाडे, कुटुंबाच पालनपोषण ह्या मोठ्या समस्या निर्माण होतात. एखादे काम जर त्यांना मिळाले तर गुलामासारखे वागवलं जात. कमी वेतनामध्ये त्यांच्याकडून जास्त तास काम करून घेतलं जात.

आज खरचं अस वाटतं आहे की हा कामगार कुठे तरी गुलामगिरीत वळत आहे. सर्व कमागार वर्गासाठी आज पुन्हा एकदा आवाज उठवायची गरज वाटतेय.कामगार कायद्याची संख्या आता शंभराच्या आसपास आहे. माथाडी कामगार, बांधकाम कामगार, नाका कामगार,अश्या अनेक कामगारांसाठी आज  शासन कल्याणकारी योजना राबवत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नाही.  त्यामुळे जो फायदा कामगारांना मिळायला हवा होता तो अद्याप त्यांना मिळत नाही. त्या योजना कामगारांपर्यंत पोहचवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. तसेच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त कामगारांच्या सुधारणे साठी आणि योगदाना साठी आपण उजाळा देऊयात.

– आरती संगीता अशोक इंगळे

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *