आधुनिक भारतात खरंच आपण स्वतंत्र आहोत का???

हो, मी स्वतंत्र आहे..! हो माझा देश स्वतंत्र आहे!

पण खरंच आपण स्वतंत्र आहोत का..? जरा विचार करा..

आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. हे अगदी बरोबर आहे, परंतु आज कित्येक भागात समाजात स्त्रियांना-मुलींना स्वतंत्र पणे जगता येत नाही. स्वतंत्र पणे फिरता येत नाही. मन मोकळे पणाने ती कधी कुठेच व्यक्त होऊ शकत नाही..!

सावित्रीबाई मुळे आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळाला आहे, पण काही भागात आज ही मुलींना शिक्षण दिले जात नाही. आई वडील आपल्या मुलींच्या इच्छा अपेक्षा भंग करतात. खेळ, नृत्य, किंवा शिक्षण यावर बंधने लादली जातात.  म्हणजे बघा एखाद्या मुलीला नृत्य ची आवड असेल, तरी तिला बंधन घालतात. का? तर लोक काय बोलतील??

‘तू नृत्य शिकणार तर लोक तुला तमासगीर म्हणतील ‘ 

तू शिक्षण घेशील तर तुझ भलं नाही होणार.  लग्न झाल्या नंतर घरचं सांभाळायला लागणार. शिक्षणाने काही फायदा नाही  होणार! अशी समाज मान्यता असते.  नंतर मुलगी एकदा काय मोठी झाली की कुटुंब सदस्यांपासून ते नातेवाईकांपर्यंत तिच्या लग्नासाठी चर्चा चालू करतात. लग्न करणं वाईट नाही. पण तिच्या पण काही इच्छा असतात. कोण विचारणार त्यांना? आई वडील आपल्या मुलीसाठी चांगलच विचार करणार. पण कधी कधी त्यांना अस वाटतं की, मुलीने कुठे चुकीचा  पाऊल उचला तर? किंवा पळून गेली तर? जाती बाहेर लग्न केल तर? लोक नाव ठेवतील. मुलगी स्वत:च्या आवडीने तिचा जीवन साथीचीही  निवड करू शकत नाही का?

अश्या या बुरसट विचारसरणीमूळे आज आपला समाज, देश पाठी आहे.

आज ही स्त्रिया आपल्या गरजा आपल्या नवऱ्याला सांगू शकतं नाही. किंवा नाही त्या मन मोकळेपणाने बोलू शकतं. असे का ? स्त्रियांना फ़क्त आणि फ़क्त एक हक्क आहे?  माहिती आहे का?  ते काय आहे. म्हणजे “स्वातंत्र्य पणे ते गुलामी करू शकतात तिच्यावर”! मग ते समाज असो किंवा कुटुंब. मग त्या स्त्रीला घर,चूल आणि मूल हेच तिच्या जीवनाचा अर्थ आहे, असे स्वीकारावं लागते. स्त्रियांना आजही सासरी सासरवास भोगावा लागतो.  मग ते शारिरीक दृष्ट्या असो किंवा मानसिक दृष्ट्या त्रास अत्याचार तर चालूच असतात.

आपल्या समाजामध्ये हुंडा प्रकरण बंद झाले असून सुद्धा ही प्रथा आजही चालुच आहे.  सासरी सर्वच गोष्टींसाठी स्त्रियांना परवानगी घ्यावी लागते. एखाद्या पिंजऱ्यातल्या वाघा प्रमाणे रहावं लागते. पण स्त्रीयांमध्ये भरपूर ताकत आहे. तरीही ती आपले आणि आपल्या आई वडिलांचे  नाव खराब होऊ नये, म्हणून नको नको ते सासरी सहन करत असते. असे का? तर समाज काय बोलेल हे पाहिल्यांदा लक्षात येते.

प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका  स्त्रीचा हात असतो. आपल्या राज्यात, आज ही स्त्रियांचा छळ केला जातो. चुकून जर बायको आपल्या नवऱ्याला दोन गोष्टी हक्कांच्या बोलली तर मारहाण, शिवीगाळ होते.  नको नको त्या गोष्टी होतातच.  ” बायको आहेस तर फक्त सेवा करत रहा.”  याच्या व्यतिरिक्त काहीही बोलायचं-करायचं तिला हक्क नसतो.

खरं म्हणजे तर स्त्री जिवंत पणे मरत असते. तरीही स्त्री जिद्दीने आणि चिकाटीने राहते, समाजामध्ये वावरते.

आजही समाजाची  विचारसरणी तशीच आहे….

 

नवरा म्हणजे पती-परमेश्वर आहे, असे समजून चालतात. मग तीच बायको आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लाऊन का चालू शकत नाही?? स्त्रियांनी स्वतःबद्दल चा आदर्श स्वतःच कमी केला आहे. पण काय अर्थ आहे ह्या जीवनाला.  मन मोकळेपणे बोला,  विचार मांडा ! ” जग हे खूप सुंदर आहे.

जीवन हे एकदाच मिळते. त्याला आनंदाने आणि स्वतंत्रपणे जगायला शिका. मग हे जग, समाज आणि कुटुंब गुलाबाच्या काट्या सारखे नाही तर अगदी गुलाबाच्या बागेसारखे दिसेल!

अहिल्याबाई यांनी जरी सती प्रथा संपवली आहे, तरी सुद्धा एखाद्या स्त्रीचा नवरा मेल्या नंतर तिला सौभाग्यवती चा हक्क मिळत नाही. लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात मान दिला जात नाही. असे का?  मग ती कोणाची आई असो, बहिण किंवा मुलगी! ह्या सर्व गोष्टींना सामोरे तर जावंच लागत ना! आपले विचार बदला रिती बदला..!

स्त्री म्हणजे अशी अभिव्यक्ती असते जी फ़क्त आपल्या क्षणिक सुखासाठी जगत नसून इतरांसाठी आपले जीवन जगत असते !

आपल्या ही जीवनाला अर्थ आहे. जीवनाला महत्व द्या ! जीवनात नकारात्मक विचार घेऊन पुढे चालू नका!

स्त्री सर्व सहन करू शकते. सर्वांत जास्त ताकत खर म्हणजे तर स्त्रीमध्ये असते. जसें हिरकणीने तिच्या उपाशी बाळा साठी गडाचे दरवाजे बंद झाल्या नंतरही एका वेगळ्या मार्गाने गड उतरली, ज्याबद्दल आपण कल्पना ही करू शकत नाही. अशी हिरकणी आपल्या प्रत्येका मध्ये सामावली तर तो दिवस जास्त लांब नाही की, आपल्या हक्कासाठी स्वातंत्र्य रित्या आपण पुढे येऊ.  जे पुरुष ही करू शकत नव्हते त्या गडावरून  हिरकणी खाली आली. अशा अवघड गडावरून हिरकणी उतरू शकते, तर स्त्रीला पुरुषा पेक्षा कमी लेखून स्री पुरुष समानता नाकरणारे आपण कोण? हे आपले युद्ध आहे आणि आपल्यालाच लढाई करायची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. मनामध्ये निराशा नाही तर एक आशा ठेवा. जेणे करून आपली पुढची पिढी सुद्धा स्वतंत्र रित्या आणि हक्काने आपले जीवन जगेल.  जर आभाळात झेप घ्यायची असेल ना तर तुमच्या आमच्या सारख्या मुलींना, स्त्रियांना प्रयत्न करत रहावे लागेल. धाडस करावे लागेल.

जग खूप मोठे आणि सुंदर आहे. सुंदरतेचे रूप बघा… आनंद लुटा… अडचणीवर मात करायला शिका आणि स्वप्नं रंगवा !!

पुन्हा एकदा विचार करा. स्वातंत्र्यपणे स्वतंत्र राहायचे आहे, की समाजमान्य बंधनांचा आदर करायचा?

मी तर ठरवल आहे, बंधनाला लाथाडून स्वतंत्र जगायचं !

पण आपलं  काय ..???

स्वतंत्रपणे जगणार! की गुलामी करणार …?

 

~ प्रियादर्शना गायकवाड

    विभाग-मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *