
घरातल्या चौकटीत स्व:तचे उभे आयुष्य कुटुंबियांसाठी समर्पित करणाऱ्या स्त्रीला समाजात स्थान मिळवून देणारी सावित्रीमाई ही केवळ एका समाजसुधारकाची पत्नी म्हणून आपल्याला माहित आहे. समाजाच्या अनिष्ट रूढी,परंपरेच्या जोखंडातून समस्त स्त्रीजातीची मुक्ती करण्यासाठी उभे आयुष्य या सामाजिक युद्धासाठी देणाऱ्या सावित्रीचे विचार हे त्या काळात इतके पुढारलेले होते कि आज ही ऐकताच अंगावर शहारे येतात.
सावित्री आई ने समाजामध्ये जे क्रांतिकारक परिवर्तन केले आहे. त्यामुळे आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. म्हणून आजची सावित्री फक्त पुस्तकात नाही, फक्त स्वयंपाक घरात नाही, फक्त चार भिंतीत नाही तर, पोलिसांच्या गणवेषात दिसते, हवाई जहाज (विमान) मध्ये दिसते, मोठं मोठ्या दवाखाण्यात दिसते, विज्ञानाच्या प्रयोग शाळेत दिसते, अंतराळात दिसते. अन ज्या माई ने शिक्षणाचे बीज पेरले ते त्याचे संगोपन करताना दिसते.
एकीकडे आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांना कदाचित या नावाचा विसर पडला आहे. अन आजच्या स्त्री ला विद्येची जननी सावित्री कळली नाही. शाळेत मुलांना सांगितले जाते सरस्वती ही विद्येची देवी आहे. सुरुवातीला पाटीवर सरस्वतीचे चित्र काढून पूजा केली जात. आता तर वही पेन, संगणकांची पूजा करताना दिसते. किती गंभीर परिस्थिती दिसते येणाऱ्या काळात! कारण आपण सर्व धार्मिक होत असल्याचे मला दिसून येत आहे. देवांच्या पाया पडा आज त्यांच्या अर्शिवादाने तुम्ही शाळेत जाताय लहानपासूनच मुलांना अशी शिकवण दिली जाते. मग कितीही मोठ्या पदवी घेतल्या तरी त्या देवी – देवत्यांच्या अर्शिवादाने पूर्ण झाली असं त्या मुलांना सुद्धा वाटत असते. व लग्नानंतर त्या सावित्रीची उपास करून वडाला 7 फेऱ्या मारायला समाजातील रूढी, परंपरा शिकवतात आणि आपण पण शिक्षण घेऊन पण असेच वागतो. पण ज्या माईने शाळा सुरू केली. त्यांच्या मुळे आज आपण शाळेत जातो. त्यांच्या मुळे आज आपण पदव्या घेऊ शकतो. ती सावित्री मात्र लपून ठेवण्याचा काम समाजव्यवस्था करत आहे.
आजची सावित्री शिक्षण तर घेते. पण शिक्षण घेऊन ही ति त्यांच गुलामगिरीत किंवा धार्मिक परंपरेत अडकून पडलेली आहे. पण मला वाटते कि, आपण त्या सावित्रीचा आदर्श घेऊ ज्यांनी समाजात क्रांतिकारक बदल केला. ज्या सावित्री माईने स्त्रियांना जाचक प्रथातून मुक्त करून स्वतंत्राशी ओळख करून दिली. जय संवित्रीने संपूर्ण महिला वर्गाला शिक्षणाचे दार खुले केले. अश्या शोषितांची ढाल झालेल्या साऊ चा आदर्श घेऊ आणि आपल्या प्रत्येका मध्ये एक क्रांतीची मशाल पेटवू. आपले उद्धारकर्ते आपण स्वत सिद्ध होऊ.
~ सिमरन मनिषा महेंद्र धोत्रे
विभाग-मुंबई