“असावा असा, ‘युवा’ देशाचा। “

निर्माण करेल  देशप्रेमाची  सर्वसमावेशी विचारधारा….. 

जातीपातीची भिंत मोडणारा , नव्या विचारांना घेवून चालणारा…. 

असावा असा युवा देशाचा।।

हक्कासाठी भांडणारा… न्यायासाठी लढणारा…. देशहित बघणारा…. शुरवीरांना जाणणारा…. 

धीटासारखे राहून गुलामगिरीला तोंड देणारा…. उठून त्याचे प्रश्न सोडवणारा…. 

 असावा असा युवा देशाचा।।

बलाढ्य , समृद्ध देश टिकवणारा….. 

जिवलगासाठी जीव देणारा…. गोर गरीबाला हात देऊन साथ देणारा…. अन्यायावर जाब विचारणारा…. 

असावा असा युवा देशाचा।।

देशाच्या मातीला न विसरणारा…. 

आपुलकीची नाती जपणारा …… 

देशासाठी प्राण अर्पणारा…. रणांगणावर  हार न मानणारा…. इतिहासात नाव  अजरामर करणारा…. 

असावा असा युवा देशाचा।

सर्वधर्म समभाव मानणारा … 

जाती धर्माचे राजकारण न  करणारा…. सर्वांमध्ये गोडवा निर्माण करणारा…. स्त्री-पुरुष समानता जोपासणारा…. 

असावा असा युवा देशाचा।।

शिवाबाच्या तलवारीसारखा चमकणारा …. 

भीमाच्या पेनासारखा धमकणारा….. 

उद्याच्या चैतन्यावर विश्वास ठेवणारा … 

निडर होऊन संरक्षण करणारा…. 

 असावा असा युवा देशाचा।

– किरण कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *