
संविधान विश्व ।आत्मा प्रास्ताविक
होऊ संविधान मय । अंतरबाहय
जगूया स्वतंत्र । मिळवूनी न्याय
बांधूया कावड । बंधुत्वाची
समतेचा विचार । स्वरूप सार्वभौम
दिली लोकशाही । सर्व जना
होऊ समाजवादी । मिळवूया हक्क
कर्तव्याची जाणीव । ठेऊनिया
धर्मनिरपेक्ष देश। मानवता एक धर्म
जपुया स्वतंत्र। उपासनेचे
तोची एक विचार । एकतेचे सार
ठेऊया जोडुनी । राष्ट्राचीये एकात्मता
मूल्यांचे शिक्षण । देऊ सकलांसी
परम कर्तव्य । समजूनिया
झालो आम्ही धन्य । बनून नागरीक
त्रिवार वंदन । शिल्पकारा
– माधुरी शिंदे (सोनावणे)
बदलापूर